पांडवकडा धबधब्यावर जाणं पर्यटकांना भोवल, ५९ जणांवर पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2020 14:04 IST2020-07-06T14:01:49+5:302020-07-06T14:04:28+5:30
सर्व नागरिकांनी लॉकडाऊनच्या नियमांचे काटेकोर पालन करावे व पांडवकडा या प्रतिबंधक क्षेत्रात प्रवेश करु नये असे आवाहान खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप तिदार यांनी केले आहे.

पांडवकडा धबधब्यावर जाणं पर्यटकांना भोवल, ५९ जणांवर पोलिसांची कारवाई
पनवेल - बंदी झुगारून पांडवकडा धबधबा येथे जाणा-या तसेच लॉक डाऊन चे उल्लंघन करणाऱ्या ५९ पर्यटकांवर खारघर पोलिसांची कारवाई केली. खारघर शहरातील पांडवकडा, फणसवाडी, ड्रायव्हिंग रेंज या प्रतिबंधित क्षेत्रात जाणाऱ्या लोकांविरुद्ध खारघर पोलिसांनी जोरदार मोहीम हाती घेतली असून गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यासाठी खारघर पोलिसांनी विनाकारण फिरणारे, मास्क न वापरणारे, सोशल डिस्टंसिंगचे पालन न करणारे यांच्याविरुद्ध कडक कारवाई केली असून एकूण ५९ लोकांवर भारतीय दंड विधान संहिता कलम 188 अन्वये 34 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. तसेच पाच वाहने देखील जप्त करण्यात आली आहेत. सर्व नागरिकांनी लॉकडाऊनच्या नियमांचे काटेकोर पालन करावे व पांडवकडा या प्रतिबंधक क्षेत्रात प्रवेश करु नये असे आवाहान खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप तिदार यांनी केले आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
जेवण दिले नाही म्हणून मुलाने आईवर झाडली गोळी अन् घेतला जीव
साखरपुडा झाल्यानंतर होणाऱ्या पत्नीवरच केला बलात्कार, पोलिसांकडून गुन्हा दाखल
मातृत्वाला काळिमा! अंगावर एकही कपडा नाही, अंगाला रक्त लागलेलं अन् नाळसह आढळले एक दिवसाचे बाळ
कोरोना संभाव्य म्हणून बसमधून फेकलेल्या १९ वर्षीय तरुणीचा मृत्यू, नातेवाईकांनी केला आरोप
कोल्ड्रिंक्समधून गुंगीचे औषध पाजले; घरी बोलावून चौघांनी अब्रू लुटली