ऑस्ट्रेलियामध्ये तरूणीची हत्या करून भारतात पळून आला, चार वर्षानंतर दिल्लीतून अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2022 09:29 AM2022-11-26T09:29:42+5:302022-11-26T09:34:23+5:30

Crime News : Toyah Codingley नॉर्थ क्वींसलॅंडमध्ये ऑक्टोबर 2018 मध्ये वांगेट्टी बीचवर मृत आढळून आली होती. हत्येचा आरोपी राजविंदर सिंह दोन दिवसांनी भारतात आला होता.

Toyah cordingley murder case 1 million dollar bounty killer from Australia arrested from Delhi | ऑस्ट्रेलियामध्ये तरूणीची हत्या करून भारतात पळून आला, चार वर्षानंतर दिल्लीतून अटक

ऑस्ट्रेलियामध्ये तरूणीची हत्या करून भारतात पळून आला, चार वर्षानंतर दिल्लीतून अटक

Next

Crime News :  2018 मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये 24 वर्षीय तरूणीची हत्या करून फरार झालेल्या आरोपीला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. खास बाब ही आहे की, एक महिन्याआधीच त्याच्यावर 1 मिलियन डॉलर म्हणजे 8 कोटी रूपयांचं बक्षीस घोषित करण्यात आलं होतं. आरोपी हत्या करून दिवसांनंतरच भारतात आला होता. तेव्हापासून तिचा शोध घेतला जात होता.

Toyah Codingley नॉर्थ क्वींसलॅंडमध्ये ऑक्टोबर 2018 मध्ये वांगेट्टी बीचवर मृत आढळून आली होती. हत्येचा आरोपी राजविंदर सिंह दोन दिवसांनी भारतात आला होता. ऑस्ट्रेलियामधून फरार झाल्यावर चार वर्षानी पोलिसांनी त्याला अटक केल्याचं सांगितलं. ऑस्ट्रेलियाकडून गेल्यावर्षी त्याला सोपवण्याची मागणी करण्यात आली होती. भारत सरकारने ती मान्य केली होती. 

राजविंदरवर गेल्याच महिन्यात 1 मिलियन डॉलरचं बक्षीस घोषित करण्यात आलं होतं. हे क्वींसलॅंडच्या इतिहासात सगळ्यात जास्त होतं. पोलिसांनी आशा व्यक्त केली होती की, राजविंदरला लवकरच अटक केली जाईल. तसं तर एखाद्याला शोधण्यासाठी बक्षीस घोषित केलं जातं, पण पोलिसांनी आरोपी राजविंदरला अटक करण्यासाठी बक्षीस घोषित  केलं होतं. 

टोयाह 21 ऑक्टोबर 2018 ला आपल्या डॉगीसोबत बीचवर फिरत होती. आरोपी आहे की, यावेळीच आरोपीने तिच्यावर हल्ला केला आणि तिची हत्या केली. जेव्हा टोयाह घरी आली नाही तेव्हा तिच्या परिवाराने तिचा शोध घेणं सुरू केलं. तेव्हा तिचा मृतदेह बीचवर आढळून आला.

पोलिसांनी राजविंदर सिंहला आरोपी ठरवलं होतं. राजविंदर सिंह एका हॉस्पिटलमध्ये जॉब करत होता. आरोपी अमृतसरच्या बटर कला गावात राहणारा होता. तो हत्येच्या दोन दिवसांनंतर आपली पत्नी, तीन मुले आणि नोकरी सोडून भारतात आला होता.

पोलिसांनी राजविंदरचा फोटो जारी केला. पण तो त्याआधीच भारतात आला होता. तो त्याच्या अमृतसरजवळच्या गावात आला होता. राजविंदरच्या परिवाराने आरोप फेटाळला. त्यांनी दावा केला की, तो हत्या करू शकत नाही. इतकंच नाही तर परिवाराने सांगितलं की, राजविंदर हत्येनंतर दोन दिवसांनी भारतात येणं केवळ योगायोग आहे.

Web Title: Toyah cordingley murder case 1 million dollar bounty killer from Australia arrested from Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.