वाहतूक पोलिसांकडून ४१८ तळीरामांवर कारवाई; आठवडाभरात ९२६ मद्यपी जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 12:22 AM2021-01-02T00:22:10+5:302021-01-02T00:22:15+5:30

४५१ सहप्रवाशी अशा एक हजार ३७७ जणांविरुद्ध पोलिसांनी कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Traffic police take action on 418 Talirams | वाहतूक पोलिसांकडून ४१८ तळीरामांवर कारवाई; आठवडाभरात ९२६ मद्यपी जाळ्यात

वाहतूक पोलिसांकडून ४१८ तळीरामांवर कारवाई; आठवडाभरात ९२६ मद्यपी जाळ्यात

googlenewsNext

ठाणे : नववर्षाच्या स्वागताच्या नावाखाली मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या ४१६ वाहनचालक, तसेच २०७ सहप्रवाशी अशा ६२३ जणांविरुद्ध ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेने ३१ डिसेंबर रोजी एकाच दिवशी कारवाई केली, तर अवघ्या आठवडाभरात ९२६ मद्यपी चालक, तसेच ४५१ सहप्रवाशी अशा एक हजार ३७७ जणांविरुद्ध पोलिसांनी कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

थर्टी फर्स्ट तसेच नववर्षाच्या स्वागताची पार्टी करण्यासाठी दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध, तसेच त्यांच्याबरोबर प्रवास करणाऱ्या मित्रमंडळींविरुद्ध पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे २५ ते ३१ डिसेंबर, २०२० दरम्यान वाहतूक शाखेच्या १८ युनिटमार्फत सुमारे ५४ पथकांनी ही कारवाई केली. गुरुवारी रात्री ठाणे शहर, भिवंडी, कल्याण, मुंब्रा, कळवा, उल्हासनगर येथे केलेल्या नाकाबंदी मोहिमेदरम्यान ९२६ मद्यप्राशन करणाऱ्या वाहनचालकांवर मोटार वाहन कायदा १८५ नुसार, तसेच सहप्रवाशांवर कलम १८८ नुसार कारवाई केली.    

Web Title: Traffic police take action on 418 Talirams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.