Video : महिलांचे मोबाईल चोरणारी गॅंग पोलिसांच्या जाळ्यात 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 06:16 PM2019-02-05T18:16:11+5:302019-02-05T18:18:05+5:30

मोहम्मद असिफ अंसार खान (19) आणि मोहम्मद सादिक अस्लम खान (20)  या आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या दोन्ही आरोपीना न्यायालयीन कोठडी सुनावली.

Trafficking of women in mobile phones | Video : महिलांचे मोबाईल चोरणारी गॅंग पोलिसांच्या जाळ्यात 

Video : महिलांचे मोबाईल चोरणारी गॅंग पोलिसांच्या जाळ्यात 

googlenewsNext
ठळक मुद्देपोलिसांनी त्यांच्याकडून 3 मोबाईल हस्तगत करण्यात आले.महिलेने त्वरित माटुंगा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केले.

मुंबई - रस्त्याने चालणाऱ्या महिलांचे मोबाईल खेचून पोबारा करणाऱ्या दोन सराईत आरोपीस माटुंगा पोलिसांनीअटक करण्यात यश आले. पोलिसांनी त्यांच्याकडून 3 मोबाईल हस्तगत करण्यात आले.

श्रुतीका सिताराम(२७) या महिला मांटुगा रेल्वे स्थानकावरून श्रध्दानंद नगर मार्गावरून घरी सायनच्या दिशेला पायी चालत जात होत्या. त्यावेळी दोन अज्ञात इसमांनी मोटार सायकलवर बसून त्यांच्याजवळ आले. त्यातील एकाने महिलेच्या हातातील मोबाईल खेचुन पळ काढला. दरम्यान, महिलेने त्वरित माटुंगा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केले. मांटुगा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस उप निरीक्षक ज्ञानेश्वर खरमाटे, हवालदार सुर्वे, पोलीस शिपाई राकेश कदम, संदिप शिंदे, राहुल चतुर, रविंद्र सोनावणे व महिला शिपाई पूनम गंभीर या पथकाने तांत्रिक दृष्ट्या तपास करत पोलीसांनी सीसीटिव्हीच्या आधारे माटुंग्यातील फाईव्ह गार्डन येथे आरोपींना अटक केली. मोहम्मद असिफ अंसार खान (19) आणि मोहम्मद सादिक अस्लम खान (20)  या आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या दोन्ही आरोपीना न्यायालयीन कोठडी सुनावली.

Web Title: Trafficking of women in mobile phones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.