साडीचा झोका घेणं मुलीच्या जीवावर बेतलं, धारावीतील खेदजनक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 23:26 IST2021-12-06T23:26:04+5:302021-12-06T23:26:36+5:30
Death Case : मुलीला फास बसल्याचे लक्षात येताच नातेवाईकांनी तिला खाली उतरवत तात्काळ सायन रुग्णालयात नेले.

साडीचा झोका घेणं मुलीच्या जीवावर बेतलं, धारावीतील खेदजनक घटना
मुंबई : साडीचा झोका घेणे १३ वर्षीय मुलीच्या जीवावर बेतल्याची घटना रविवारी धारावीत घडली आहे. या घटनेने कुटुंबियांना धक्का बसला आहे. याप्रकरणी धारावी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ वर्षीय मृत मुलगी धारावीतील राजीव गांधी नगर परिसरात कुटुंबियांसोबत राहायची. रविवारी सायंकाळी ती नेहमी प्रमाणे आपल्या घराच्या पोटमळ्याला साडीने बांधलेल्या झोक्यावर खेळत होती. झोका खेळत असताना अचानक तिचा तोल गेला. तिने स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न केला मात्र, साडीचा फास तिच्या गळ्याभोवती घट्ट झाल्याने तिची शुद्ध हरपली.
मुलीला फास बसल्याचे लक्षात येताच नातेवाईकांनी तिला खाली उतरवत तात्काळ सायन रुग्णालयात नेले. तेथे उपचारादरम्यान तिला मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी धारावी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.