पत्नीसोबत भांडला, रेल्वे रुळांवर जाऊन झोपला; तितक्यात ट्रेन आली अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 01:16 PM2021-05-31T13:16:56+5:302021-05-31T13:17:19+5:30
पत्नीसोबत होत असलेल्या भांडणामुळे तो वैतागला आहे. तो रेल्वेखाली येऊन आत्महत्या करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर झोपला होता.
जाको राखे साइयां, मार सके न कोय... ही म्हण यूपीच्या मथुरेतील एका तरूणावर तंतोतंत बसते. पत्नीसोबत होत असलेल्या रोजच्या भांडणाला कंटाळून तो आत्महत्या करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर झोपला. रेल्वे आली आणि त्याच्यावरून गेली. मात्र, सुदैवाने तरूणाला काहीच इजा झाली नाही. त्याचा जीव वाचला.
Navbharat Times ने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना मथुरेच्या राया पोलीस स्टेशन भागातील मांट रेल्वे क्रॉसिंग येथील आहे. इथे बहादीन येथे राहणारा ४५ वर्षीय पुरूष गजेंद्र पत्नीसोबतच्या रोजरोजच्या भांडणाला कंटाळला होता. त्यामुळे आत्महत्या करून आपलं जीवन संपण्याचा त्याने निश्चय केला होता.
रायामध्ये रेल्वेखाली येऊन आत्महत्या करण्यासाठी आलेला गजेंद्र रेल्वे टॅकवर झोपला. तरूणाला रेल्वे ट्रॅकवर झोपलेलं पाहून त्याचा वाचवण्यासाठी आजूबाजूचे लोक आरडाओरड करू लागले होते. पण तोपर्यंत रेल्वेल त्याच्या अंगावर निघून गेली होती. रेल्वे गेटमनने धावत जाऊन पाहिले तर तरूणी निवांत तिथेच पडलेला होता. नंतर त्याला काही लोकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच राया प्रभारी निरीक्षक उत्तमचंद पटेल हेही घटनास्थळी पोहोचले. बरंच समजावल्यानंतर पोलीस तरूणाला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले. घटना रेल्वेशी संबंधित असल्याने आरपीएफचे उप-निरीक्षक नारायण सिंह हे सुद्धा तिथे पोहोचले.
उप-निरीक्षक नारायण सिंह यांनी सांगितले की, तरूण म्हणाला की, पत्नीसोबत रोज छोट्या छोट्या गोष्टीवरून त्याचं भांडण होत राहतं. पत्नीसोबत होत असलेल्या भांडणामुळे तो वैतागला आहे. तो रेल्वेखाली येऊन आत्महत्या करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर झोपला होता. मात्र, त्याची वेळ आली नव्हती. तरूणाला समजावून घरी परत पाठवण्यात आलं.