शिकाऊ डॉक्टरचा शासकीय रुग्णालयात खून; अधिष्ठाता यांनी दिला राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 04:57 PM2021-11-11T16:57:42+5:302021-11-11T16:59:11+5:30
Trainee doctor murdered : या घटनेनंतर वैद्यकीय विद्यार्थ्यांनी गुरुवारी संपूर्ण रुग्णालयाचे कामकाज बंद केले. रुग्णालय परिसर सिल कुणालाही महाविद्यालयात येऊ दिले जात नव्हते.
यवतमाळ - येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात एमबीबीएस अंतिम वर्षाचा विद्यार्थी डॉक्टर अशोक सुरेंद्र पाल याचा खून करण्यात आला. या घटनेनंतर वैद्यकीय विद्यार्थ्यांनी गुरुवारी संपूर्ण रुग्णालयाचे कामकाज बंद केले. रुग्णालय परिसर सिल कुणालाही महाविद्यालयात येऊ दिले जात नव्हते.
महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर मिलिंद कांबळे यांचा राजीनामा मागितल्या नंतरच विद्यार्थ्यांनी आंदोलनाची तीव्रता कमी केली. मात्र गुरुवारी सायंकाळपर्यंत महाविद्यालय परिसराचे सर्व प्रवेश द्वार बंद होते. जिल्हाधिकारी अमोल येडगे पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ घटनास्थळी उपस्थित होते. त्यांची आंदोलक विद्यार्थ्यांशी प्रदीर्घकाळ चर्चा झाली. कॉलेजमध्ये डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित करत विद्यार्थ्यांनी आंदोलन केले अधिष्ठाता यांचा पुतळाही जाळला.