४ वरिष्ठ निरीक्षकांसह २५ अधिकाऱ्यांच्या बदल्या, सहाय्यक आयुक्तांचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 09:26 PM2020-02-27T21:26:52+5:302020-02-27T21:33:55+5:30
प्रशासकीय कारणास्तव निर्णय
मुंबई - मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्या वाढीव मुदतीला अवघे दोन दिवस उरले असताना मुंबईतील प्रत्येकी चार सहाय्यक आयुक्त व वरिष्ठ निरीक्षकांसह एकूण २५ पोलीस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत. मध्यावती कालावधीत केलेल्या सर्व बदल्या या प्रशासकीय कारणास्तव करण्यात आल्या आहेत. त्याला आस्थापना मंडळाची मान्यता घेतल्याने त्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आक्षेप घेता येणार नाही.
गुन्हे शाखेतील अप्पर आयुक्त संगिता पाटील यांची कुलाबा विभागात तर विजय बाणे यांची उत्तर नियंत्रण कक्षातून साकीनाका विभागात बदली केली आहे. तर मिलिंद खेतले (साकीनाका -पायधुनी), शांतीलाल जाधव (पायधुनी- अंधेरी) बदली केली आहे. वरिष्ठ निरीक्षकामध्ये प्रताप भोसले (आर्थिक गुन्हे-पंतनगर), रामचंद्र होवाळे (विशेष शाखा-२- सशस्त्र पोलीस), विद्यासागर कालकुंद्रे (एसबी-१-वडाळा टीटी) आणि संजय बैडाळे (एसबी-१ ते काळाचौकी ) यांचा समावेश आहे.
उर्वरित १७ अधिकारी हे पोलीस निरीक्षक दर्जाचे असून सर्वजण सशस्त्र दलामध्ये (एलए) कार्यरत होते. त्यांची विविध पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे.