अंबाजोगाईत वाहतूक शाखेची दमदार कामगिरी; आठवडाभरात २२० वाहनांकडून ७० हजारांचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 06:51 PM2018-07-05T18:51:22+5:302018-07-05T18:52:08+5:30

आठवडाभरापासून शहर वाहतूक शाखेकडून विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत २२० वाहनांवर दंडात्मक कारवाई करून तब्बल ७० हजारांचा दंड वसूल करण्यात आला. 

Transportable branch of Ambajogai; Recovery of fine of 70 thousand by 220 vehicles in the week | अंबाजोगाईत वाहतूक शाखेची दमदार कामगिरी; आठवडाभरात २२० वाहनांकडून ७० हजारांचा दंड वसूल

अंबाजोगाईत वाहतूक शाखेची दमदार कामगिरी; आठवडाभरात २२० वाहनांकडून ७० हजारांचा दंड वसूल

googlenewsNext

अंबाजोगाई (बीड) : शहरात बेफाम ऑटोरिक्षा आणि सुसाट दुचाकींमुळे अपघात वाढले होते. तसेच वाहनचोरीच्या घटनांमध्येही वाढ झाली होती. यामुळे आठवडाभरापासून शहर वाहतूक शाखेकडून विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत २२० वाहनांवर दंडात्मक कारवाई करून तब्बल ७० हजारांचा दंड वसूल करण्यात आला. 

काही दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास शिकवणी आटोपून घराकडे निघालेल्या विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची घटना घडली होती. यानंतर पोलिसांनी रोडरोमिओ, सुसाट दुचाकीस्वार आणि बेफाम रिक्षा चालकांविरोधात मोहीम हाती घेतली. शहर वाहतूक पोलिसांनी यात पुढाकार घेऊन सर्व वाहनांची कागदपत्रे तपासण्यास आणि नियमबाह्य पद्धतीने वाहन चालाविणारांवर कारवाईस सुरुवात केली. मागील आठवडाभरापासून दिवसरात्र हि  मोहीम सुरु आहे. यात शाळा, महाविद्यालये आणि खाजगी क्लासेस परिसरावर विशेष लक्ष ठेवण्यात आले.

मागील आठवडाभरात पोलिसांनी शेकडो वाहनांची कागदपत्रे तपासली. ज्या वाहनांची कागदपत्रे अपूर्ण आहेत अश्या १०५ ऑटोरिक्षा आणि २१५ दुचाकीस्वारांवर कारवाई करून ५६ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर, कागदपत्रेच नसलेली वाहने जप्त करण्यात आली आहेत. तसेच, रस्त्यावर अस्ताव्यस्तपणे लावलेल्या हातगाड्यांवरही कारवाई करण्यात आली. ११ हातगाड्यांवर खटला भरून १३ हजार २०० रुपये दंड ठोठावण्यात आला. या कारवाईतून चार चाकी वाहनधारकही सुटले नसून रहदारीस अडथळा होईल अश्या पद्धतीने वाहने उभे करणाऱ्या चार वाहनचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

हि कारवाई अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक सोमनाथ गिते यांच्या नेतृत्वात फौजदार आडके, वाहतूक शाखेचे सहा. फौजदार बिडगर, साठे, पो.ना. घोळवे, पुरी, सोपने आदींनी पार पाडली. वाहतूक पोलिसांच्या या दमदार कामगिरीचे नागरीकातून स्वागत करण्यात येत आहे. 
 
सर्व कागदपत्रे सोबत ठेवावी 
“वाहनधारकांनी वाहनाची सर्व कागदपत्रे आणि लायसन्स सोबत ठेवावे. ट्रिपल सीट वाहन चालवू नये. रिक्षाचालकानी गणवेश घालणे आवश्यक आहे. दोषींवर नियमानुसार कडक कारवाई करण्यात येईल.”
- सोमनाथ गिते, पोलीस निरीक्षक, अंबाजोगाई शहर

Web Title: Transportable branch of Ambajogai; Recovery of fine of 70 thousand by 220 vehicles in the week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.