लोन ॲपच्या जाळ्यात अडकला, तुम्ही ‘भामटे, अत्याचारी’ नव्हे, तर पीडित आहात !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 10:27 AM2022-05-27T10:27:30+5:302022-05-27T10:28:08+5:30

लोन ॲपच्या जाळ्यात अडकलेल्याशी संवाद साधा ; मानसोपचारतज्ज्ञांची पोलिसांना विनंती

Trapped in a loan app, you are not a 'villain, a tyrant', you are a victim! | लोन ॲपच्या जाळ्यात अडकला, तुम्ही ‘भामटे, अत्याचारी’ नव्हे, तर पीडित आहात !

लोन ॲपच्या जाळ्यात अडकला, तुम्ही ‘भामटे, अत्याचारी’ नव्हे, तर पीडित आहात !

Next

गौरी टेंबकर - कलगुटकर

मुंबई : ‘तू ८ वर्षांच्या मुलीवर अत्याचार केला आहेस आणि आता आमच्याकडून कर्ज घेतल्यावर ते परत करत नाहीस, तुझे नग्न फोटो आम्ही नातेवाईकांना व्हायरल करतो.’ अवघ्या दोन हजार रुपयांच्या इन्स्टंट लोनसाठी मालाडच्या तरुणाला धमक्या दिल्या गेल्या. जो गुन्हा केलेलाच नाही त्या गुन्ह्यासाठी अशा धमक्या संबंधित तरुणाला दिल्या गेल्या. त्यामुळे घाबरलेल्या तरुणाने वेळीच कुटुंबियांशी चर्चा केली आणि थेट स्थानिक पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी ‘त्या’ तरुणाची समजून काढली. पोलिसांनी संवाद साधल्यामुळेच ‘वसुली एजंट’कडून मिळणाऱ्या धमक्यांचा सामना तो सक्षमपणे करू शकला. या तरुणासारखी अनेकांची अवस्था होऊ शकते. त्यामुळे पोलिसांनी अशा लोकांशी संवाद साधल्यास गुन्हेगारीपणाची भावना जाऊन आपण अत्याचारी व भामटे नसून, पीडित असल्याची भावना निर्माण होईल आणि आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल थांबवता येईल, असे मत मानसोपचारतज्ज्ञांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

इन्स्टंट लोन ॲप ‘एंजल’मधून मालवणीत राहणाऱ्या आणि नामांकित कंपनीत इमेज एडिटर म्हणून काम करणाऱ्या तरुणाला अवघे २,२०० रुपयांचे कर्ज देण्यात आले. मात्र, अवघ्या तीन ते चार दिवसात ५ हजार रुपये भरण्याची बळजबरी करण्यास सुरुवात झाली. त्यानंतर त्याचे नाव वापरत त्याला अत्याचारी, भामटा, बेशरम आणि अनेक अर्वाच्च भाषेत मेसेज पाठवत शिवीगाळ केली जाऊ लागली. नातेवाईकांना बदनाम करण्याच्या धमक्या दिल्या गेल्या. ‘मी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला आणि आता कर्ज घेऊन ते परत करत नाही’, असे मेसेज व्हायरल करण्याचेही व्हॉट्सॲप कॉल करून सांगण्यात आले. यापूर्वी कुरारमध्ये संदीप कोरगावकर यांनी जसे टोकाचे पाऊल उचलले तशाच भावना माझ्या मनात येऊ लागल्या. मी तणावात गेलो मात्र नंतर याबाबत मी माझ्या घरच्यांना सांगितले. मोठ्या बहिणीशी चर्चा करत तिच्या सल्ल्याने  मालवणी पोलीस ठाण्यात लेखी अर्ज आणि व्हॉट्सॲपवर आलेल्या धमक्यांच्या स्क्रीनशॉट्सच्या प्रती देत एनसी दाखल केली. पोलिसांनी मला धीर दिला आणि समजूत काढली. त्यामुळे मी आरोपी नाही, ही सकारात्मक भावना माझ्यात निर्माण झाली. आताही मला मेसेज व फोन येतात. मात्र, मी त्याकडे दुर्लक्ष करतो. कुटुंब आणि पोलिसांच्या मदतीनेच मी सावरलो आहे, असे या तरुणाने सांगत त्यांचे आभार मानले.

 प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. युसूफ माचीसवाला यांच्या म्हणण्यानुसार, ‘आपण अत्याचारी किंवा चिटर आहोत व आपले विवस्त्र फोटो (भलेही ते मोर्फ असले तरी) व्हायरल झाल्याने मनात एक लाजिरवाणी भावना निर्माण होते. आपण कुठेही तोंड दाखवू शकत नाही, असे वाटून अपराधीपणाची भावना पुढे जाऊन आत्महत्येचे पाऊल उचलण्यास प्रवृत्त करते. कर्जाची रक्कम क्षुल्लक असली तरी त्याची परतफेड करता येत नाही, असा मेसेज नातेवाईकांमध्ये जाऊन बदनामीची भीतीही याला खतपाणी घालते. त्यामुळे सर्वप्रथम इन्स्टंट लोन देणाऱ्या फसव्या ॲपला बळी पडू नये तसेच बळी पडलोच तर कोणतीही लाज किंवा अपराधीपणाची भावना न ठेवता कुटुंबाशी संवाद साधा आणि स्थानिक पोलिसांशी संपर्क साधा. पोलिसांच्या कामाचा व्याप पाहता त्यांना समुपदेशनाची जबाबदारी देणे शक्य होणार नाही. 

इन्स्टंट लोन ॲपमधून मालाडच्या तरुणाला पाठवलेला बदनामीचा मेसेज

लोन ॲपची बळी ठरलेली प्रकरणे : 
नोव्हेंबर, २०२० : अभिषेक मकवाना
मार्च, २०२२ : दक्षा बोरीचा
मे, २०२२ : संदीप कोरेगावकर

Web Title: Trapped in a loan app, you are not a 'villain, a tyrant', you are a victim!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.