प्रेमाच्या जाळ्यात व्यावसायिकाला अडकवून, पैशाच्या बहाण्याने घरी बोलावले अन् महिलेने काढले स्वतःचे कपडे काढले मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2022 04:47 PM2022-01-28T16:47:28+5:302022-01-28T16:49:58+5:30

Honeytrap Case : या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. तर मुख्य आरोपी महिला अद्याप फरार आहे.

Trapped in a love trap, the businessman was called home on the pretext of money and the woman took off her own clothes then ... | प्रेमाच्या जाळ्यात व्यावसायिकाला अडकवून, पैशाच्या बहाण्याने घरी बोलावले अन् महिलेने काढले स्वतःचे कपडे काढले मग...

प्रेमाच्या जाळ्यात व्यावसायिकाला अडकवून, पैशाच्या बहाण्याने घरी बोलावले अन् महिलेने काढले स्वतःचे कपडे काढले मग...

Next

राजस्थानमधील धौलपूर जिल्ह्यात हनी ट्रॅपचे प्रकरण समोर आले आहे. येथे एका व्यावसायिकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून हनी ट्रॅपचा बळी बनवण्यात आला आहे. एवढेच नाही तर आरोपी महिलेने व्यावसायिकाला ब्लॅकमेल करून दोन लाख रुपये वसूल केले. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. तर मुख्य आरोपी महिला अद्याप फरार आहे.

एसएचओ आध्यात्मा गौतम यांनी सांगितले की, जगदंबा कॉलनीत राहणारा 55 वर्षीय मुरारीलाल 15 जानेवारी रोजी शहरातील घंटाघर रोडने आपल्या घरी जात होते. वाटेत एका महिलेने थांबून ओळख सांगून दोन हजार रुपयांची मदत मागितली. त्यानंतर व्यापारी मुरारीलालने महिलेला पैसे दिले. यानंतर दोघांनीही आपापले मोबाईल नंबर एकमेकांना दिले.

आईसह प्रियकराने केले दुष्कृत्य, मुलाची हत्या करून मध्य प्रदेशात नेऊन झाडाला लटकवला मृतदेह

एसएचओने सांगितले की, 18 जानेवारी रोजी भोगीराम कॉलनीत राहणाऱ्या 40 वर्षीय महादेवीने व्यावसायिकाला पैसे परत करण्यासाठी हाऊसिंग बोर्ड कॉलनीत घरी बोलावले. जिथे महिलेने जबरदस्तीने तिचे कपडे काढले. दरम्यान, घरमालक सीताराम घरात घुसले. त्यांनी महिला आणि व्यावसायिकाला आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले. त्यानंतर घरमालक सीताराम याने व्यावसायिकाकडे चार लाख रुपयांची मागणी केली. न दिल्यास व्यावसायिकाला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. या घटनेने घाबरलेल्या व्यावसायिकाने दोन लाख रुपयांत सौदा केला. पैसे दिल्यानंतरही आरोपी व्यावसायिकावर दबाव टाकत होता. त्यानंतर पीडितेने कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांना ब्लॅकमेल करणाऱ्या सीतारामला ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणातील मुख्य आरोपी महिला फरार असून महिलेच्या शोधासाठी पोलिसांचे पथक तयार करण्यात आले आहे.

Web Title: Trapped in a love trap, the businessman was called home on the pretext of money and the woman took off her own clothes then ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.