उत्तर प्रदेश पुन्हा हादरले, झोपेत असलेल्या तीन मुलींवर अॅसिड हल्ला
By महेश गलांडे | Published: October 13, 2020 12:59 PM2020-10-13T12:59:02+5:302020-10-13T12:59:46+5:30
गोंडा जिल्ह्याच्या परसपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून तिन्ही मुली झोपेत असताना अज्ञाताने हा हल्ला केला. या घटनेनं परिसरात खळबळ माजली असून पोलिसांनी तत्काळ तपास हाती घेतला आहे.
लखनौ - उत्तर प्रदेशमधील हाथरस प्रकरणा ताजे असताना तीन मुलींवर अॅसिड फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गोंडा जिल्ह्यातील तीन बहिणींव अॅसिड हल्ला करण्यात आला असून त्यामध्ये मोठी बहिण गंभीर जखमी झाली आहे. तर, दोन बहिणी किरकोळ जखमी झाल्या आहेत. तिन्ही बहिणींना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेमागील कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांकडून हल्लेखोराचा शोध घेण्यात येत आहे.
गोंडा जिल्ह्याच्या परसपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून तिन्ही मुली झोपेत असताना अज्ञाताने हा हल्ला केला. या घटनेनं परिसरात खळबळ माजली असून पोलिसांनी तत्काळ तपास हाती घेतला आहे. या घटनेनंतर मुलींच्या वडिलांनी प्रतिक्रिया देताना गावात कुणाशीही वैर नसून सर्वांशी सलोख्याचे संबंध असल्याचे सांगतिलंय.
गॅस सिलिंडरचा भडका उडून मुली होरपळल्या असतील असे सुरुवातीला वाटले. मात्र, एका तरुणाने अॅसिड फेकल्याचे मुलीने सांगितले. अॅसिड हल्ल्यानंतर मुलगी किंचाळली. पोलीस अधिकारी सुधीर सिंह यांनी अॅसिड हल्ल्याच्या घटनेला दुजोरा दिला आहे. पोलीस घटनेचा तपास करत आहेत. हल्ल्यातील पीडित मुलींमध्ये मोठी मुलगी 17 वर्षांची आहे. तर, इतर दोन मुली 12 आणि 8 वर्षांच्या आहेत.