पाेलीस मुख्यालयात थरार; स्वत:चा गळा चिरून आत्महत्येचा प्रयत्न   

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2021 08:53 PM2021-02-01T20:53:39+5:302021-02-01T20:54:31+5:30

Suicide Attempt : वाटमारीतील संशयिताने कापला स्वत:चा गळा

Tremors at police headquarters; Attempted suicide by slitting throat | पाेलीस मुख्यालयात थरार; स्वत:चा गळा चिरून आत्महत्येचा प्रयत्न   

पाेलीस मुख्यालयात थरार; स्वत:चा गळा चिरून आत्महत्येचा प्रयत्न   

Next
ठळक मुद्देविशाल रामचंद्र  मानेकर (२४, रा. जरीपटका, नागपूर) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या संशयिताचे नाव आहे.

यवतमाळ : कळंब तालुक्यातील २१ लाखांच्या वाटमारीच्या गुन्ह्यात  स्थानिक गुन्हे शाखेने संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या आराेपीने यवतमाळ पाेलीस मुख्यालयात स्वत:चा गळा चिरून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना साेमवारी सायंकाळी ७ वाजता घडली. या घटनेने जिल्हा पाेलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

विशाल रामचंद्र  मानेकर (२४, रा. जरीपटका, नागपूर) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या संशयिताचे नाव आहे. कळंब - राळेगाव मार्गावर सावरगाव शिवारात  व्यापाऱ्याला अडवून त्याच्याकडून २१ लाखांची राेकड आराेपींनी लंपास केली. या घटनेचा तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत आहे. या प्रकरणात त्यांनी आतापर्यंत चार संशयितांना ताब्यात घेतले. माेहदा, हिंगणघाट व नागपूर येथील संशयितांचा यात समावेश आहे. पाेलिसांनी हा गुन्हा जवळपास उघड केला आहे. मात्र, चाेरीला गेलेली राेख रक्कम वसूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

नागपुरात कुख्यात असलेल्या विशाल याला पाेलिसांनी चाैकशीसाठी ताब्यात घेतले. त्याचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. पाेलीस आपल्याकडून राेख रक्कम वसूल करतील, या भीतीने त्याने संधीसाधून धारदार वस्तूने स्वत:चा गळा कापून घेतला. ताे रक्ताच्या थाराेळ्यात काेसळला असल्याने पाेलिसांनाही चांगलाच धक्का बसला. त्यांनी विशालला तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याच्या गळ्यावर टाके घालण्यात आले. त्याची प्रकृती सद्या स्थिर असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. मात्र, घटनाक्रमानंतर त्याच्याभोवती पाेलीस कर्मचारीच हाेते. एवढी माेठी घटना घडूनही वरिष्ठ अधिकारी वृत्त लिहिस्ताेवर तेथे फिरकला नाही. संशयिताच्या या कृत्याने पाेलीस कर्मचारी हादरले आहेत.


पाेलीस बरेचदा गुन्हा उघड करण्यासाठी आराेपींना ताब्यात  घेऊन ठेवतात, नंतर संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाल्यानंतर आराेपींना अटक दाखवून न्यायालयात हजर केले जाते. याशिवाय सराईत गुन्हेागार कबुली देत नाही. अशा स्थितीत वरिष्ठांनी जबाबदारी घेण्याची गरज असते. तथापि, या पक्ररणात सध्या तरी कर्मचारीच बाजू सांभाळताना दिसले.  आता या घटनेच्या चाैकशीत काय निष्पन्न हाेते, याकडे लक्ष लागले आहे.

मृतदेह ठेवले होते पलंगात लपवून; छत्तीसगडचे माजी मंत्री डी. पी. घृतलहरे यांच्या सुनेसह नातीची हत्या 

 

हि दोस्ती तुटायची नाय; मित्राने आवाज दिला नसता तर आज मी वाचलो नसतो  


वाटमारीत चार संशयित ताब्यात
वाटमारीच्या गुन्ह्यात माेहदा येथे रहिवासी व यवतमाळात कृषी महाविद्यालयात शिकणाऱ्या युवकाने हा वाटमारीचा कट रचल्याचे पुढे आले आहे. मात्र, त्याला अजून आराेपी बनविण्यात आले नाही. त्याने एकतर्फी प्रेमातून युवतीच्या अंगावर फेकलेले तीन लाख पाेलिसांनी जप्त केले आहेत. याशिवाय इतर तीन आराेपींना ताब्यात घेतले आहे. हिंगणघाट येथील संशयिताने वाटमारीच्या पैशांतून वाहन खरेदी केल्याचीही चर्चा आहे.

Web Title: Tremors at police headquarters; Attempted suicide by slitting throat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.