मुलगी झाली म्हणून पत्नीला दिला तिहेरी तलाक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 05:39 PM2019-05-17T17:39:59+5:302019-05-17T17:41:49+5:30

उत्तर प्रदेशातील प्रकार; आरोपी मुंबईत पसार

Triple divorce given to wife due she delivered girl child | मुलगी झाली म्हणून पत्नीला दिला तिहेरी तलाक

मुलगी झाली म्हणून पत्नीला दिला तिहेरी तलाक

googlenewsNext
ठळक मुद्देकुर्ला येथील रहिवासी असलेली साबरीन खातून (२०) हिचा मोहम्मद वकील खानसोबत २०१६ मध्ये विवाह झाला. माहेराहून पैशांसह महागड्या वस्तू आणण्यासाठी आग्रह सुरू केला मुलीच्या सुरक्षेसाठी त्यांनी घाबरून मुलीसह मुंबई गाठली.

मुंबई - मुलगी झाली म्हणून पत्नीला तिहेरी तलाक देत घराबाहेर काढल्याचा प्रकार उत्तर प्रदेशमध्ये घडला. तेथे गुन्हा दाखल होताच पती मुंबईत पळून आला. त्याला अटक करून बिहार पोलिसांच्या ताब्यात द्या, म्हणून तरुणीने मुंबई पोलिसांकडे मदत मागितली. मात्र, आमच्या हद्दीत गुन्हा घडला नसल्याने अटक करू शकत नसल्याचे उत्तर पोलिसांनी दिले आहे.
कुर्ला येथील रहिवासी असलेली साबरीन खातून (२०) हिचा मोहम्मद वकील खानसोबत २०१६ मध्ये विवाह झाला. नुकताच गेल्या वर्षी तिने मुलीला जन्म दिला. तेव्हापासून सासरच्यांकडून तिचा छळ सुरू झाला. तिला माहेराहून पैशांसह महागड्या वस्तू आणण्यासाठी आग्रह सुरू केला. तिने नकार देताच मारहाण सुरू केली. याबाबत तिच्या वडिलांना समजताच त्यांनी मुलीकडे धाव घेतली. मुलीला होत असलेल्या मारहाणीबाबत विचारणा करताच त्यांनी कारसह पैशांची मागणी केली. मात्र आता वृद्धावस्थेत कुठून एवढे पैसे आणणार म्हणून त्यांनी जमणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे सासरच्या मंडळींनी तिच्या वडिलांना मारहाण करत पाठवून दिल्याचे खातूनने सांगितले. त्यानंतर त्याने, तिला तिहेरी तलाक दिला. अखेर, तिने तेथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. मुलीच्या सुरक्षेसाठी त्यांनी घाबरून मुलीसह मुंबई गाठली. गुन्हा दाखल केल्यानंतर, खानही मुंबईत आला आणि कुर्ला परिसरात लपून बसल्याची माहिती मिळताच साबरीनने बुधवारी रात्री, याबाबत विनोबा भावे नगर पोलीस ठाणे गाठले.

Web Title: Triple divorce given to wife due she delivered girl child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.