"बाईक, फ्रीज पाहिजे, नाहीतर..."; हुंडा न मिळाल्यावर नवरा म्हणाला, "तलाक-तलाक-तलाक"
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2023 09:53 AM2023-05-19T09:53:55+5:302023-05-19T09:54:41+5:30
सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी महिलेचा छळ केला. एवढेच नाही तर हुंडा न मिळाल्याने पतीने तलाक देऊन दुसरे लग्न केलं.
उत्तर प्रदेशातील बांदा येथे पुन्हा एकदा ट्रिपल तलाकचे खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी महिलेचा छळ केला. एवढेच नाही तर हुंडा न मिळाल्याने पतीने तलाक देऊन दुसरे लग्न केलं. पत्नीला घरातून हाकलून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित महिलेने या प्रकरणाची तक्रार एसपीकडे केली असून आरोपीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण पैलानी पोलीस ठाण्यातील महवरा गावातील आहे. येथे राहणाऱ्या एका महिलेने तक्रारीत सांगितले की, 16 डिसेंबर 2017 रोजी मुस्लिम रितीरिवाजांनुसार तिचा निकाह पार पडला, निकाहानंतर पती आणि इतर सासरचे लोक हुंड्यात बाईक, फ्रीज इत्यादी गोष्टींची मागणी करत राहिले. या वस्तू दिल्या नाही म्हणून त्यांनी शारीरीक आणि मानसिक छळ केला.
महिलेचा आरोप आहे की, तिला मारहाण करून घरातून हाकलून दिले, ती तिच्या माहेरच्या घरात राहत असल्याने तिच्या वडिलांसह इतर नातेवाईकांना अनेकदा त्रास दिला. तिच्यासोबत गैरवर्तन केले आणि पतीने तिला घराबाहेर हाकलून दिले. तलाक दिला. तलाक दिल्यानंतर पतीने फतेहपूर येथील एका मुलीशी निकाह केल्याचा पत्नीचा आरोप आहे. पीडित महिलेने लेखी तक्रार करून सासरच्या लोकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सध्या, एसपी अभिनंदन यांच्या आदेशानुसार, हुंडा कायदा, कट रचणे यासह अनेक कलमांखाली महिलेच्या पतीसह सासरच्या 6 जणांविरुद्ध पलानी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. स्टेशन प्रभारी या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत. याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे अधिकारी सांगतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.