संतापजनक! ...अन् काही मिनिटांत 16 वर्षांचं नातं तुटलं; गरम पाणी दिल्याने पतीने दिला तलाक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2021 11:14 AM2021-12-19T11:14:25+5:302021-12-19T11:23:04+5:30

Triple Talaq : पत्नीने गरम पाणी दिलं म्हणून पतीने तिला ट्रिपल तलाक दिल्याची संतापजनक घटना आता समोर आली आहे.

triple talaq husband wife fight hot water police uttar pradesh barabanki police | संतापजनक! ...अन् काही मिनिटांत 16 वर्षांचं नातं तुटलं; गरम पाणी दिल्याने पतीने दिला तलाक

संतापजनक! ...अन् काही मिनिटांत 16 वर्षांचं नातं तुटलं; गरम पाणी दिल्याने पतीने दिला तलाक

Next

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमध्ये नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. पती-पत्नीमध्ये गरम पाण्यावरून भांडण झालं आणि पुढे ते भांडण टोकाला गेलं. या भांडणातूनच संतापलेल्या पतीने अवघ्या काही मिनिटांत तब्बल 16 वर्षांचं नातं संपवलं आहे. पत्नीने गरम पाणी दिलं म्हणून पतीने तिला ट्रिपल तलाक दिल्याची संतापजनक घटना आता समोर आली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या बाराबंकीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या जोडप्याच्या निकाहाला 16 वर्षे झाली असून त्यांना पाच मुलं आहेत. 

देशामध्ये ट्रिपल तलाकच्या अनेक घटना सातत्याने समोर येत आहेत. पीडितेने या प्रकरणी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. जहांगीराबाद पोलीस ठाणे परिसरातील सदरुद्दीन गावात ही भयंकर घटना घडली. एका छोट्याशा कारणावरून पतीने टोकाचा निर्णय घेतला आणि पत्नीला ट्रिपल तलाक दिला. यानंतर महिलेने आपल्या भावासोबत पोलीस ठाण्यात जाऊन तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला आणि पतीवर नाते तोडल्याचा आरोप केला आहे. 

गरम पाण्यावरून भांडण झालं

पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पीडितेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, निकाहानंतर सासरच्या मंडळींनी खूप छळ केला. मानसिक आणि शारीरीक त्रास दिला. आपल्याला पाच मुलं असून सर्वात लहान मुलगा हा दोन वर्षांचा आहे. गुरुवारी औषध घेताना पतीला गरम पाणी दिलं म्हणून ते नाराज झाले. रागाच्या भरात त्याने मला घराबाहेर काढलं आणि तीन वेळा तलाक म्हणून ट्रिपल तलाक दिला. त्यानंतर घरामध्ये असलेल्या सर्व मुलांना मारहाण केली. 

ट्रिपल तलाक देऊन पतीने 16 वर्षांचं नातंच संपवलं

एसओ दर्शन यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने पतीवर ट्रिपल तलाक दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून अनेकांची चौकशी करण्यात येत आहे. तसेच आपली मुलं लहान असल्याने त्यांची देखभाल करण्यासाठी कोणीच नसल्याचं देखील महिलेने म्हटलं आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
 

Web Title: triple talaq husband wife fight hot water police uttar pradesh barabanki police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.