निकाहच्या 2 तासानंतरच दिला तिहेरी 'तलाक', पत्नीला मंडपात सोडून वरात माघारी परतली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2023 03:07 PM2023-07-14T15:07:21+5:302023-07-14T15:46:32+5:30

मुलाने लग्नानंतर हुंड्यात कारची मागणी केली. मुलीच्या भावाची पोलिसांत तक्रार.

Triple 'talaq' was given after 2 hours of marriage, case filed against groom in Agra | निकाहच्या 2 तासानंतरच दिला तिहेरी 'तलाक', पत्नीला मंडपात सोडून वरात माघारी परतली

निकाहच्या 2 तासानंतरच दिला तिहेरी 'तलाक', पत्नीला मंडपात सोडून वरात माघारी परतली

googlenewsNext

Agra News: उत्तर प्रदेशातील आग्रा येथून हुंड्याच्या लालसेपोटी लग्नाच्या 2 तासानंतर मुलीला तलाक दिल्याची घटना घडली आहे. हुंड्यात कार न मिळाल्याने मुलाने लग्नानंतर लगेच नववधूला तिहेरी तलाक दिला. वधूला लग्नमंडपात सोडून वरात परत निघाली. या प्रकरणी वधूच्या भावाने ताजगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पती आसिफ, सासू मुन्नी, सासरा परवेज, दीर सलमान, रुखसार, नजराना आणि फरीन यांची नावे आहेत.

ढोलीखार मंटोला या शहरात राहणाऱ्या मुस्लिम कुटुंबातील दोन सख्या बहिणींचे लग्न अमन आणि आसिफ यांच्याशी ठरले होते. ठरल्याप्रणाणे गेल्या बुधवारी फतेहाबाद रोडवर असलेल्या प्रियांशू गार्डनमध्ये निकाह पार पडला. अमनने थोरल्या बहिणीला पत्नी म्हणून स्वीकारले प्रथेनुसार बुधवारी तिची पाठवणी झाली. गुरुवारी पहाटे धाकटी मुलगी डॉलीची पाठवणी होती, पण आसिफ आणि त्याच्या कुटुंबीयांनी हुंडा म्हणून कारची मागणी करण्यास सुरुवात केली. 

अचानक आलेल्या या मागणीमुळे वधूचे कुटुंबीय घाबरले. वऱ्हाडीला समजावून सांगण्यासाठी लाखो विनंत्या केल्या, पण हुंडा हव्यासापोटी वराने कोणाचेही ऐकले नाही आणि नववधूला तीन वेळा तलाक देऊन लग्न घरातून निघून गेले. मुलाच्या कृत्यानंतर वधूच्या कुटुंबात खळबळ उडाली. घरातील सदस्य खूप अस्वस्थ आहेत. पोलिसांनी सांगितले की, तक्रार आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची पाहणी सुरू आहे.

तिहेरी तलाक असंवैधानिक 
22 ऑगस्ट 2017 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने आपल्या निर्णयात तिहेरी तलाक असंवैधानिक घोषित केला होता. सर्वोच्च न्यायालयाने 1400 वर्षे जुनी प्रथा असंवैधानिक असल्याचे म्हटले आणि सरकारला कायदा करण्यास सांगितले. न्यायालयाच्या निर्णयानंतर केंद्र सरकारने कायदा करून तीन तलाक म्हणणे किंवा लिहून लग्न मोडणे गुन्हाच्या श्रेणीत आणले. या गुन्ह्यासाठी जास्तीत जास्त तीन वर्षांच्या कारावासाचीही तरतूद आहे.
 

Web Title: Triple 'talaq' was given after 2 hours of marriage, case filed against groom in Agra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.