ट्रिपल तलाकप्रकरणी ट्रॉम्बे पोलिसांनी मौलानाला केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 09:27 PM2018-11-21T21:27:58+5:302018-11-21T21:28:23+5:30
ट्राॅम्बेच्या चिता कॅम्प परिसरात कनिस शफिक ही घटस्फोटीत महिला आपल्या दोन मुलांसह तिच्या कुटुंबियांसोबत रहात होती. त्याच वेळी घरातल्यांनी दुसरे लग्न करण्यास सुचवले. मोहम्मद उमर शेख यांचे स्थळ ही त्यांना चालून आले. उमर शेख यांच्या पत्नीचे निधन झाल्यामुळे त्यांनी कनिस शफिक यांना मागणी घातली होती.
मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने ट्रिपल तलाक विरोधात हरकत घेतली असताना सर्वोच्च न्यायालयाच्या अटी शर्थींचे उल्लघंन करत ट्रिपल तलाक देणाऱ्या मौलाना मोहम्मद उमर शेख (वय ५५) याला ट्राॅम्बे पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद हा ट्राॅम्बेतील मेहराज मस्जिदमध्ये काम करतो.
ट्राॅम्बेच्या चिता कॅम्प परिसरात कनिस शफिक ही घटस्फोटीत महिला आपल्या दोन मुलांसह तिच्या कुटुंबियांसोबत रहात होती. त्याच वेळी घरातल्यांनी दुसरे लग्न करण्यास सुचवले. मोहम्मद उमर शेख यांचे स्थळ ही त्यांना चालून आले. उमर शेख यांच्या पत्नीचे निधन झाल्यामुळे त्यांनी कनिस शफिक यांना मागणी घातली होती. मात्र, मुलांचा संभाळ करण्याच्या अटीवरूनच कनिसा हे लग्न करण्यास तयार झाली. त्यानुसार २८ एप्रिल २०१७ रोजी दोघांचा विवाह झाला. विवाहानंतर सुरवातीचे काही महिने दोघांनी संसार व्यवस्थित केला. मात्र, कालांतराने मुलांचा संभाळ करण्यावरून दोघांमध्ये खटके उडू लागले. या वादातून उमरने कनिसला अनेकदा मारहाण देखील केली. तसेच तिला लग्नात घरातल्यांनी दिलेले दागिने काढून घेत पुन्हा तिच्या घरी पाठवले. याबाबत कनिसाच्या घरातल्यांनी ट्राॅम्बेच्या उमर शेख कार्यरत असलेल्या मशिदीतील मौलानांना ही बाब सांगितल्यानंतर उमर पुन्हा कनिसाला घेऊन घरी परतला. मात्र घरी आल्यानंतर पुन्हा दोघांमध्ये मुलांवर भांडणे होत होती.२७ आॅक्टोबरला उमरने कनिसाला तिच्या माहेरी सुट्टीनिमित्त पाठवले. त्यानंतर त्याने खोली भाड्याने देऊन स्वतः दुसरीकडे राहू लागला. कालांतराने कनिसा घरी परतली असता. घराला टाळे होते. त्यावेळी तिने उमरला फोन केला. त्याने तिला घरातल्यांकडून १ लाख रुपये घेऊन ये, नाहीतर दुसरे लग्न करण्यासाठी धमकावले. कनिसाला उमरपासून दिवस गेले होते. काही महिन्यातच तिची प्रसुती देखील झाली. मुलगा झाल्याने उमर त्याला स्वतःजवळ ठेवण्यासाठी कनिसासोबत भांडत होता. या प्रकरणी कनिसाने ट्राॅम्बे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. याचा राग अनावर झाल्याने मोहम्मद उमर शेखने कनिसाला मोबाइलवरच ट्रिपल तलाक दिला. या प्रकरणी कनिसाने गुन्हा नोंदवल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक मेघा नरवडे यांनी सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी उमर शेख या मौलाना विरोधात गुन्हा नोंदवत त्याला अटक केली आहे.