टीआरपी घोटाळा: 15 व्या आरोपीला पुण्यातून अटक; BARC चा माजी सीईओ गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2020 10:28 PM2020-12-24T22:28:51+5:302020-12-24T22:29:13+5:30

TRP Scam: BARC ही टीआरपी अधिकृतरित्या मॉनिटर करणारी संस्था आहे. या संस्थेने लोकांच्या घरांमध्ये बॅरोमीटर लावण्याची जबाबदारी हंसा रिसर्च एजन्सीला दिली होती. 

TRP scam: 15th accused arrested from Pune; Former CEO of BARC | टीआरपी घोटाळा: 15 व्या आरोपीला पुण्यातून अटक; BARC चा माजी सीईओ गजाआड

टीआरपी घोटाळा: 15 व्या आरोपीला पुण्यातून अटक; BARC चा माजी सीईओ गजाआड

googlenewsNext

मुंबई : बनावट टीआरपीप्रकरणी आज १५ व्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुण्यातून ब्रॉडकास्ट ऑडियंस रिसर्च काउंसिल (BARC) चे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांना ताब्यात घेण्यात आले आहे. 


दासगुप्ता यांना पुणे ग्रामीण परिसरातून अटक करण्यात आली. यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांची मदत घेण्यात आली. क्राईम इंटेलिजन्स युनिटने ही कारवाई केली. 


दासगुप्ता यांनी रात्री उशिरा मुंबईत आणण्यात आले. त्यांना शुक्रवारी रिमांडसाठी न्यायालयात हजर केले जाणार आहे. या प्रकरणी BARC मधून दुसरी व एकूण १५ वी अटक झाली आहे. काही आठवड्यांपूर्वी BARC चे माजी COO रोमिल रामगढ़िया यांना अटक करण्यात आली होती. तर रिपब्लिक टीव्हीच्या सीईओलाही अटक करण्यात आली होती. BARC ही टीआरपी अधिकृतरित्या मॉनिटर करणारी संस्था आहे. या संस्थेने लोकांच्या घरांमध्ये बॅरोमीटर लावण्याची जबाबदारी हंसा रिसर्च एजन्सीला दिली होती. 


हंसाच्या कर्मचाऱ्यांनाही यामध्ये अटक करण्यात आली आहे. CIU ने बीएआरसीच्या काही अधिकाऱ्यावर लाच घेऊन काही चॅनलवर टीआरपीमध्ये घोटाळा केल्याचे आरोप आहेत. रामगढ़िया यांचे काही व्ह़ॉट्सअॅप चॅट CIU च्या हाती लागले होते. हे चॅट रामगढिया यांनी डिलीट केले होते. मात्र, फॉरेन्सिक लॅबने हे डिलिट केलेले चॅट पुन्हा मिळविले होते. 

Web Title: TRP scam: 15th accused arrested from Pune; Former CEO of BARC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.