TRP Scam : अर्णब गोस्वामीला बनवले आरोपी; मुंबई पोलिसांकडून पुरवणी आरोपपत्र दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 03:12 PM2021-06-22T15:12:43+5:302021-06-22T15:13:59+5:30

TRP Scam : मुंबई पोलिसांनी अर्नबला पुरवणी आरोपपत्रात आरोपी बनविले आहे.

TRP Scam: Arnab Goswami made accused; Supplementary chargesheet filed by Mumbai Police | TRP Scam : अर्णब गोस्वामीला बनवले आरोपी; मुंबई पोलिसांकडून पुरवणी आरोपपत्र दाखल 

TRP Scam : अर्णब गोस्वामीला बनवले आरोपी; मुंबई पोलिसांकडून पुरवणी आरोपपत्र दाखल 

Next
ठळक मुद्देतत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अर्णब गोस्वामी यांनाही या टीआरपी घोटाळ्यामध्ये सामील असल्याचे सांगितले होते. पोलिसांनी कोर्टात दाखल केलेल्या १८०० पानांच्या आरोपपत्रात याचा उल्लेख केला आहे.

मुंबई - बनावट टीआरपी प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. मुंबईपोलिसांनी अर्नबला पुरवणी आरोपपत्रात आरोपी बनविले आहे.

मुंबई पोलिसांनी ९ महिन्यांपूर्वी याप्रकरणी एफआयआर नोंदविला होता. तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अर्णब गोस्वामी यांनाही या टीआरपी घोटाळ्यामध्ये सामील असल्याचे सांगितले होते. आरोपपत्रात पोलिसांनी अर्णबसह पाच जणांची नावे दिली आहेत. अर्णब व्यतिरिक्त एआरजी आउटलेटर मीडिया (ज्यात रिपब्लिक टीव्हीचा मालक आहे) मधील चार लोकांची नावे आहेत. पोलिसांनी कोर्टात दाखल केलेल्या १८०० पानांच्या आरोपपत्रात याचा उल्लेख केला आहे.

या प्रकरणात सह आरोपी म्हणून सीओओ प्रिया मुखर्जी,  शिवेंदु मुलेकर , शिव सुंदरम अशीही नावे आहेत. जे यापूर्वी हवे होते. आतापर्यंत पोलिसांनी १५ लोकांविरूद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. ज्यामध्ये बीएआरसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दास गुप्ता आणि रिपब्लिक टीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास खानचंदानी यांचा समावेश आहे. 

Read in English

Web Title: TRP Scam: Arnab Goswami made accused; Supplementary chargesheet filed by Mumbai Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.