टीआरपी घोटाळा प्रकरण: रिपब्लिकसाठी पैसे पुरविणारा हंसाचा माजी कर्मचारी अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2020 08:13 AM2020-10-17T08:13:42+5:302020-10-17T08:13:58+5:30
विरारमधून घेतले ताब्यात
मुंबई : रिपब्लिक चॅनेल्स पाहण्यासाठी पैसे पुरविणाऱ्या हंसाच्या आणखी एका माजी कर्मचाºयाला गुन्हे गुप्तवार्ता विभागाने (सीआययू) शुक्रवारी अटक केली. उमेश मिश्रा असे त्याचे नाव असून या प्रकरणातील ही मोठी अटक असल्याचे सूत्रांनी सांगितले.
टीआरपी घोटाळ्याप्रकरणी यापूर्वी हंसा कंपनीचा विशाल वेद भंडारी (२१), अंधेरीतील बोमपेली नारायण मिस्त्री (४४), बॉक्स सिनेमाचे नारायण नंदकिशोर शर्मा (४७), फक्त मराठीचे शिरीष सतीश पत्तनशेट्टी (४४) आणि उत्तर प्रदेशमधून विनय त्रिपाठीला अटक करण्यात आली आहे. तर, दिनेश विश्वकर्मा, रॉकी तसेच अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.
सीआययूचे प्रमुख
सचिन वाझे यांच्यासह तपास अधिकारी नंदकुमार गोपाळे यांना मिश्राबाबत माहिती मिळताच, त्याला शुक्रवारी विरारमधून अटक करण्यात आली. तो रिपब्लिक चॅनेल्स पाहण्यासाठी पैसे पुरवत होता. गेल्या वर्षभरापासून तो हे काम करत होता. त्याला कोण
पैसे पुरवत होते? यामागे नेमके कुणाचे षड्यंत्र होते, याबाबत अधिक तपास सुरू आहे.