टीआरपी घोटाळा प्रकरण: ‘रिपब्लिक’च्या आणखी तीन अधिकाऱ्यांची आज चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2020 02:28 AM2020-10-11T02:28:27+5:302020-10-11T06:52:40+5:30
हजर राहण्यासाठी बजावले समन्स
मुंबई : बनावट टीआरपी रेटिंगद्वारे कोट्यवधींच्या जाहिराती मिळवून नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी रिपब्लिक टीव्ही चॅनेलच्या आणखी तीन अधिकाऱ्यांना शनिवारी समन्स बजाविण्यात आले. त्यानुसार, मुख्य कार्यकारी अधिकारी विकास खानचंदानी, कार्यकारी अधिकारी हर्ष भंडारी व प्रिया मुखर्जी यांना रविवारी सकाळी गुन्हे शाखेत चौकशीसाठी हजर राहावे लागेल.
मुख्य वित्तीय अधिकारी (सीएफओ) शिव सुंदरम यांनी शनिवारी चौकशीसाठी हजर राहण्याबाबत पत्राद्वारे असमर्थता दर्शविल्यानंतर अधिकाºयांनी इतरांकडे विचारणा करण्याचे ठरविल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी मॅडिसन वर्ल्डचे संस्थापक अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सॅम बलसारा यांच्याकडून पोलिसांनी माहिती घेतली.
बनावट टीआरपी रँकिंग मिळवून त्याच्या आधारे जाहिराती मिळविण्यासाठी वृत्तवाहिन्यांना मदत करणाºया रॅकेटचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला. याबाबत रिपब्लिकसह अन्य दोन लहान टीव्ही चॅनेलवरही गुन्हा दाखल केला आहे. त्यासंबंधी चॅनेलच्या आर्थिक व्यवहाराबाबत माहिती घेण्यासाठी पोलिसांनी ‘सीएफओ’ शिव सुंदरमला शुक्रवारी समन्स जारी केले होते. ब्रॉडकास्ट आॅडियन्स रिसर्च कौन्सिलच्या (बीएआरसी) तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी हे रॅकेट उघडकीस आणले आहे.
पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता शिव सुंदरम यांनी हजर न होता, पत्र लिहून मुदतवाढ मागितली. चौकशीला सहकार्य करण्यास तयार आहोत, मात्र याबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे, ती होईपर्यंत आमच्या कोणाकडे चौकशी करू नये, मी वैयक्तिक कारणाने मुंबईबाहेर असून केवळ १४ व १५ आॅक्टोबरला येणार असल्याचे कळविले. त्यामुळे अधिकाºयांनी रिपब्लिक चॅनलच्या अन्य तीन अधिकाºयांकडे चौकशी करण्याचा निर्णय घेतला.