TRP Scam : रिपब्लिक टीव्हीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला मुंबई पोलिसांनी बजावले समन्स 

By पूनम अपराज | Published: October 9, 2020 08:12 PM2020-10-09T20:12:48+5:302020-10-09T20:17:08+5:30

TRP Scam : या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीच्या बँक खात्यांचे फॉरेन्सिक ऑडिटही केले जाईल. माहितीनुसार, पुरावांमध्ये छेडछाड केल्याचा गुन्हा रिपब्लिक टीव्हीवरही नोंदविला जाऊ शकतो.

TRP Scam: Republic TV CFO summoned by Mumbai Police | TRP Scam : रिपब्लिक टीव्हीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला मुंबई पोलिसांनी बजावले समन्स 

TRP Scam : रिपब्लिक टीव्हीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला मुंबई पोलिसांनी बजावले समन्स 

Next
ठळक मुद्देमुंबई पोलिसांनी रिपब्लिक टीव्ही सीएफओ (चीफ फायनान्स ऑफिसर) शिवा सुब्रमणियम सुंदरम यांना समन्स बजावले आणि मुंबई गुन्हे शाखेने त्यांना 10 ऑक्टोबरला (शनिवार) चौकशीत हजर राहण्यास सांगितले आहे.


मुंबई - चुकीच्या पद्धतीने टीआरपी मिळवण्यासाठी सक्रिय असलेल्या दोन मराठी चॅनेलच्या मालकांना अटक करून खोट्या टीआरपीचे रॅकेट उघड करण्यात मुंबईपोलिसांना यश आलं आहे. त्यासाठी बदनामी करून पैसे देऊन टीआरपीशी छेडछाड करण्यात आली असल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी काल दिली. फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा या दोन मराठी चॅनेलच्या मालकांना अटक करण्यात आली आहे. आज दुसर्‍याच दिवशी शुक्रवारी  मुंबई पोलिसांनी रिपब्लिक टीव्ही वरिष्ठ अधिकाऱ्याला चौकशीसाठी समन्स पाठवले आहे. मुंबई पोलिसांनी रिपब्लिक टीव्ही सीएफओ (चीफ फायनान्स ऑफिसर) शिवा सुब्रमणियम सुंदरम यांना समन्स बजावले आणि मुंबई गुन्हे शाखेने त्यांना 10 ऑक्टोबरला (शनिवार) चौकशीत हजर राहण्यास सांगितले आहे.

या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीच्या बँक खात्यांचे फॉरेन्सिक ऑडिटही केले जाईल. माहितीनुसार, पुरावांमध्ये छेडछाड केल्याचा गुन्हा रिपब्लिक टीव्हीवरही नोंदविला जाऊ शकतो. रिपब्लिक टीव्हीच्या प्रवर्तक आणि इतर कर्मचाऱ्यांना देखील समन्स बजावले जाणील. त्यांना तपास पथकासमोर हजर राहण्यास सांगितले जाऊ शकते.



या तपासात गुन्हे शाखेचे सीआययू एसीपी शशांक सांडभोर हे प्रमुख आहेत तर डीसीपी आणि जॉईंट सीपी या तपासात मदत करत आहेत. मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या म्हणण्यानुसार, या वाहिन्यांकडे जो निधी आला आहे तो टीआरपीशी छेडछाड करून मिळतो की नाही ते तपासून त्यानुसार कारवाई केली जाईल का याचीही चौकशी केली जाईल. देशाच्या इतर भागातही असेच रॅकेट चालविण्यात येत असल्याचा मुंबई पोलिसांचा संशय आहे. मुंबई पोलिस आयुक्तांनी असेही म्हटले आहे की दोषी, ते कोणीही असू शकतील त्यांची चौकशी केली जाईल आणि “आम्ही या फसवणूकीचे प्रकरण योग्य त्या निष्कर्षापर्यंत नेऊ”. बनावट टीआरपीचे रॅकेटचा भांडाफोड मुंबई पोलिसांच्या सीआययुच्या पथकाने केला आहे. घरात विशिष्ट्य चॅनेल सुरू ठेवण्यासाठी पैसे दिले जात असल्याचं संशय असून टीआरपी रेटिंगमध्ये घोटाळा केल्याप्रकरणी हंसा कंपनीच्या माजी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. टीआरपीसाठी घरांमध्ये ५०० रुपयांपासून पैसे देण्यात आले होते. फक्त मराठी बॉक्स सिनेमा आणि रिपब्लिक टीव्ही या तीन प्रमुख चॅनेल आरोपी आहेत.रिपब्लिक टीव्हीच्या पदाधिकाऱ्यांना समन्स बजाविण्यात येणार आहे. सहभागी असाणाऱ्या सर्वांवर अटकेची कारवाई करण्यात येणार आहे. कितीही मोठा आरोपी असला तरी संबंधितांवर कठोर कारवाई करणार असल्याची माहिती सिंग यांनी दिली. बँक खाते तपासले जात आहे. फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने तपास सुरु असून यात रिपब्लिक टिव्हीनेही अशाप्रकारे पैसे घेऊन टीआरपी वाढवल्याचा संशय आहे. अन्य चॅनेलबाबतही चौकशी सुरु असल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दिली होती. 

Web Title: TRP Scam: Republic TV CFO summoned by Mumbai Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.