कशिवली घाटात ट्रक पलटी; चालकाने मारली उडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2022 11:15 AM2022-01-15T11:15:22+5:302022-01-15T11:15:27+5:30
काही दिवसांपूर्वी याच घाटात खचलेल्या वळणावर एक टवेरा चारचाकी वाहन पलटी झाले होते. त्याचेही नुकसान झाले होते.
- हुसेन मेमन, जव्हार
जव्हार विक्रमगड रस्त्यावर घाटात वळणावर शनिवारी पावडरने भरलेला ट्रक वळणावर पलटी होऊन अपघात झाला आहे. सुदैवाने ट्रक मधील वाहन चालकाने उडी मारल्यामुळे कोणतीही जिवीतहानी झाली नसून, ट्रक व त्यामधील मालाचे मात्र प्रचंड नुकसान झाल्याची घटना घडली.
या रस्त्यावरील कशिवली घाट हा पूर्ण वळणाचा असून याठिकाणी रस्ताला संरक्षणभिंत नसून, रस्तेही कडेने पूर्णपणे खचले आहेत. काही दिवसांपूर्वी याच घाटात खचलेल्या वळणावर एक टवेरा चारचाकी वाहन पलटी झाले होते. त्याचेही नुकसान झाले होते.
मागील दोन वर्षांपासून हा राष्ट्रीय महामार्गात विलीन झाले आहे. मात्र संबंधित विभागाचे या कडे कानाडोळा केला आहे. त्यामुळे रस्ता रुंदीकरण, संरक्षण भिंती व मजबुती करण अशा उपाययोजना कराव्यात अशी मागणी वाहन चालक करीत आहेत.
जव्हार हुन नाशिक, सेलवास, डहाणू, पालघर कडे जाणारे सर्वच रस्ते घाटाचे आहेत, मात्र राष्ट्रीय महामार्ग विभागाने रस्त्यांच्या देखभाल दुरुस्ती रुंदीकरनाकडे दुर्लक्ष केले आहेत, त्यामुळे येथे वारंवार अपघात होत आहेत.
- मनोज कामडी, सामाजिक कार्यकर्ते जव्हार