एकतर्फी प्रेमातून विवाहितेला जबरदस्ती पळविण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2020 04:55 PM2020-06-03T16:55:19+5:302020-06-03T16:59:38+5:30

गुन्हा दाखल : घरात घुसून केली अंगलट

Trying to escape a married woman out of one-sided love pda | एकतर्फी प्रेमातून विवाहितेला जबरदस्ती पळविण्याचा प्रयत्न

एकतर्फी प्रेमातून विवाहितेला जबरदस्ती पळविण्याचा प्रयत्न

Next
ठळक मुद्देपीडित महिला पती व तीन मुलासह एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत वास्तव्याला आहे.आपण दोघं पळून जावू’ असे पीडिताला सांगायला लागला. पीडितेने मी तुझ्या समाजाची नाही, त्याशिवाय माझे लग्न झालेले आहे असे सांगून तु इथून निघून जा म्हणून त्याला हाकलण्याचा प्रयत्न केला.

जळगाव : एकतर्फी प्रेमातून २८ वर्षीय विवाहितेला घरातून पळून जाण्यासाठी जबरदस्ती व घरात घुसून अंगलट करणाऱ्या खुशाल मराठे (रा.रामेश्वर कॉलनी) या तरुणाविरुध्द एमआयडीसी पोलिसातविनयभंग व अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. संशयित हा मोबाईल दुरुस्तीचे काम करतो.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला पती व तीन मुलासह एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत वास्तव्याला आहे. पीडितेचा पती बांधकामावर मजुरीने कामाला जातो. पीडित व खुशाल मराठे याची मोबाईल दुरुस्तीच्या निमित्ताने सहा महिन्यापूर्वी ओळख झाली आहे. मंगळवारी दुपारी तीन वाजता पीडिता मुलीसह घरात असताना तेथे खुशाल मराठे आला. ‘मला तु खूप आवडेस, माझे तुझ्यावर प्रेम आहे. आपण दोघं पळून जावू’ असे पीडिताला सांगायला लागला. पीडितेने मी तुझ्या समाजाची नाही, त्याशिवाय माझे लग्न झालेले आहे असे सांगून तु इथून निघून जा म्हणून त्याला हाकलण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने जबरदस्तीने अंगलटपणा करुन ‘माझे तुझ्यावर प्रेमआपण पळून जावू, लग्न करु असे’ पुन्हा सांगू लागला. त्यावर पीडितेने त्याला धक्का मारुन लांब केल्यावर खुशाल याने तु माझ्यासोबत आली नाही तर तुला जीवंत मारुन टाकेन अशी धमकी दिली.त्यामुळे पीडितेने त्याला धक्का मारुन घरातून पलायन केले. दरम्यान, हा प्रकार झाला तेव्हा घर मालक व मालकीन हे देखील उपस्थित होते. पती कामावरुन आल्यानंतर त्यांना झाल्याप्रकाराची माहिती दिली. त्यानुसार रात्री एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठून पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांच्यापुढे घटनाक्रम कथन केला. सहायक पोलीस निरीक्षक सुनंदा पाटील यांनी पीडित महिलेची फिर्याद घेऊन विनयभंग व अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल केला. सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन यांनीही पीडितेकडून माहिती जाणून घेतली.

आईच्या विवाहबाह्य संबंधात अडसर ठरला मुलगा म्हणून प्रियकराला सांगून काढला काटा

 

लॉकडाऊनमधील पहिलाच निकाल : साक्षीदार फितूर तरीही, बालिकेचा खून करणाऱ्यास जन्मठेप


रिक्षातून दवाखान्यात पाठलाग
१ जून रोजी सायंकाळी सहा वाजता पोटात त्रास होत असल्याने विवाहिता गल्लीतील मैत्रीणीला घेऊन रिक्षाने रिंगरोडवरील दवाखान्यात जायला निघाली असता खुशाल याने तेव्हा देखील दुचाकीने रिक्षाचा पाठलाग करुन रिक्षा अडवली व त्या रिक्षात बसून दवाखान्यात आला. तेथे त्याने डॉक्टरांशी वाद घातला. तेथून घरी परत येत असताना देखील खुशाल याने विवाहितेचा पाठलाग केला. या दिवशी त्याच्या दहशतीमुळे तक्रार दिली नाही. दुसऱ्या दिवशी देखील असाच प्रकार झाल्याने विवाहितेने पोलिसात तक्रार दिली. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन करीत आहेत.

Web Title: Trying to escape a married woman out of one-sided love pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.