लातूरमध्ये ST कर्मचाऱ्यांच्या संपाला हिंसक वळण; निलंग्याकडे जाणाऱ्या बसवर दगडफेक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2021 02:41 PM2021-12-13T14:41:35+5:302021-12-13T19:37:55+5:30

Trying to shut down bus services :सोमवारी लातूर येथून निलंग्याकडे निघालेल्या बसवर जाऊ पाटीनजीक दगडफेक करण्यात आली.

Trying to shut down bus services; Throwing stones on Latur-Nilanga route bus | लातूरमध्ये ST कर्मचाऱ्यांच्या संपाला हिंसक वळण; निलंग्याकडे जाणाऱ्या बसवर दगडफेक

लातूरमध्ये ST कर्मचाऱ्यांच्या संपाला हिंसक वळण; निलंग्याकडे जाणाऱ्या बसवर दगडफेक

googlenewsNext

निलंगा/ किल्लारी (जि. लातूर) : लातूर येथून निलंग्याकडे प्रवासी घेऊन निघालेल्या बसवर लातूर-बीदर महामार्गावरील जाऊ पाटीनजीक अज्ञाताने दगडफेक केल्याची घटना साेमवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत किल्लारी पाेलीस ठाण्यात दाेघा अज्ञाताविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हल्ला करणारे माेटारसायकलवरुन पसार झाल्याचे समाेर आले आहे.

पाेलिसांनी सांगितले, गत ४६ दिवसांपासून एसटी महामंडळाचे राज्या शासनात विलनिकरण करण्यात याव, या मागणीसाठी एसटी कामगार, कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. महागाई भत्ता, घरभाडे वाढ आणि मूळ वेतनात करण्यात आलेल्या वाढीनंतरही राज्यासह लातूर विभागातील एसटी कामगार, कर्मचारी आपल्या विलनिकरणाच्या मागणीवर अडून बसले आहेत. परिणामी, संप काळात प्रवाशांचे माेठ्या प्रमाणावर हाल सुरु आहेत. दरम्यान, निलंगा आणि औसा आगारातील काही चालक-वाहक कामावर रुजू झाले आहेत. निलंगा आगरातील सात, औसा आगारातील दोन आणि लातूर आगारातील दोन बसेस शनिवार, रविवार आणि साेमवारी धावल्या. साेमवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास लातूर येथून निलंग्याकडे प्रवासी घेऊन निघालेल्या बसवर (एम.एच.२० बीएल २०१७) लातूर-बीदर महामार्गावरील जाऊ पाटीवर दोघा अज्ञाताने दगडफेक करून बसच्या समोरील काचा आणि खिडकीच्या काच फोडल्या. दगडफेक करणाऱ्या दाेघा अज्ञातांनी ताेंडाला कपडा बांधलेला हाेता. दरम्यान, दगडफेक करुन ते नंबरप्लेट नसलेल्या लाल रंगाच्या मोटारसायकलवरुन पासर झाले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली.

९ हजारांचे नुकसान...

बसवर करण्यात आलेल्या दगडफेकीत बसचे जवळपास ९ हजारांचे नुकसान झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याबाबत जयशंकर गुरुलिंग स्वामी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन किल्लारी पोलिस ठाण्यात दाेघा अज्ञाताविराेधज्ञत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमादार गणेश यादव करीत आहेत.

Web Title: Trying to shut down bus services; Throwing stones on Latur-Nilanga route bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.