ट्रेनमध्ये 2 TTE ची दादागिरी; प्रवाशाला खाली पाडून तुडव तुडव तुडवलं, कारण शुल्लक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2023 06:33 PM2023-01-06T18:33:53+5:302023-01-06T18:34:27+5:30

प्रवाशाला खाली पाडून छाती आणि तोंडावर लाथा घातल्या.

TTE thrashed passenger badly in pawan express in bihar | ट्रेनमध्ये 2 TTE ची दादागिरी; प्रवाशाला खाली पाडून तुडव तुडव तुडवलं, कारण शुल्लक

ट्रेनमध्ये 2 TTE ची दादागिरी; प्रवाशाला खाली पाडून तुडव तुडव तुडवलं, कारण शुल्लक

googlenewsNext


पाटणा: अनेकदा ट्रेनमध्ये तिकिट चेक करणाऱ्या TTE सोबत प्रवाशांनी गैरवर्तन केल्याचे किस्से तुम्ही ऐकले असतील. पण, बिहारमध्ये पवन एक्स्प्रेसमध्ये दोन TTE ने प्रवाशालाच बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. ट्रेनच्या जनरल डब्यात वरच्या सीटवर बसलेल्या एका प्रवाशाला दोन टीटीईंने खाली ओढलं आणि लाथांनी तुडवलं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर दोन्ही टीटीईंना निलंबित करण्यात आलं आहे. पवन एक्सप्रेस गाडी जयनगरहून मुंबईकडे जात होती. दोन्ही TTE समस्तीपूर रेल्वे विभागाच्या जयनगर रेल्वे स्थानकावर कार्यरत आहेत.


 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गौतम पांडे आणि नरेश कुमार अशी या दोन्ही TTEची नावे आहेत. हे मारहाणीचं प्रकरण 2 जानेवारी रोजी घडल्याची माहिती आहे. जयनगर येथून ट्रेन सुटल्यानंतर दोन टीटीई ट्रेनच्या जनरल डब्यात चढले. त्यांनी प्रवाशांची तिकिटे तपासण्यास सुरुवात केली. यावेळी एका प्रवाशाकडे तिकीट नसल्यानं त्याचं चलन कापण्यास सांगितलं. यानंतर प्रवासी आणि टीटीई यांच्यात वाद आणि शिवीगाळ झाली. काही वेळातच वाद वाढला.

वाद इतका वाढला की, टीटीनं प्रवाशाला ओढून खाली पाडलं लाथांनी तुडवलं. यावेळी त्या प्रवाशाच्या छातीवर आणि चेहऱ्यावर अनेकदा लाथा मारण्यात आल्या. काही वेळानंतर आजूबाजूला उपस्थित असलेल्या प्रवाशांनी आरडाओरडा करत टीटीईला रोखलं. पीडित प्रवासी बेशुद्ध झाल्यावर मारहाण थांबवली. ट्रेनमध्ये उपस्थित असलेल्या एका प्रवाशाने या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवला. लाइव्ह हिंदुस्थाननं हे वृत्त दिलं असून, व्हिडिओ शेअर केला आहे.
 

Web Title: TTE thrashed passenger badly in pawan express in bihar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.