गांजा , गावठी कट्टासह १३ दुचाकी असा बारा लाखांचा मुद्देमाल जप्त; नऊ आरोपींना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 04:51 PM2021-06-29T16:51:48+5:302021-06-29T16:52:43+5:30

Crime News : भिवंडीत दरोडयाचा प्रयत्न, जबरी चोरी, घरफोडी, मोटार सायकल चोरी करणाऱ्या नऊ आरोपींना अटक करण्यात शांतीनगर पोलिसांना यश

Twelve lakh items including 13 two-wheelers including cannabis and Katta seized; Nine accused arrested | गांजा , गावठी कट्टासह १३ दुचाकी असा बारा लाखांचा मुद्देमाल जप्त; नऊ आरोपींना अटक

गांजा , गावठी कट्टासह १३ दुचाकी असा बारा लाखांचा मुद्देमाल जप्त; नऊ आरोपींना अटक

Next
ठळक मुद्देपोलिसांच्या सतर्कतेने दरोड्यापूर्वीच आरोपींना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. 

नितिन पंडीत

भिवंडी - भिवंडी पोलीस परिमंडळ क्षेत्रात दुचाकी व चैन स्नेचिंग गुन्ह्यांच्या संख्येत वाढ झाली असताना वाढत्या गुन्हेगारी कारवायांना पायबंद घालण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली असून शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने नऊ आरोपींच्या मुसक्या आवळीत विविध १६ गुन्ह्यांची उकल करीत १२ लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे . ज्यामध्ये दुचाकी चोरी ,घरफोडी ,दरोड्याचा प्रयत्न ,अमली पदार्थ संबंधातील गुन्ह्यांचा समावेश असल्याची माहिती भिवंडी पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी मंगळवारी शांतीनगर पोलीस ठाण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे .

          

शांतीनगर पोलीस ठाण्यातील पोलिस उप निरीक्षक निलेश जाधव व त्यांच्या पथकास गुप्त बातमीदारांमार्फत माहिती घेऊन रेकॉर्ड वरील मलंग यासर जाफरी , मोहम्मद आसिफ मोहम्मद इम्तियाज अन्सारी ( दोघे रा.पिराणी पाडा, शांतीनगर ) यांना ताब्यात घेऊन त्यांच्या कडे कसून चौकशी केली असता त्यांच्या जवळून भिवंडीसह नवी मुंबई ,मुंब्रा या भागातून चोरी केलेल्या ८ दुचाकींसह पाच बेवारस दुचाकी दोन मोबाईल एक सोन्याची चैन असा एकूण ८ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

          

तर पोलीस गस्ती दरम्यान रात्री अडीच वाजताच्या सुमारास एका कार मध्ये मोहम्मद नुमान नूरअली अन्सारी , जहांगीर दाऊद शेख , नफिस उर्फ राजू शहाबुद्दीन अन्सारी फिरत असताना या तिघा जणांना संशयावरून ताब्यात घेत त्यांची अंग झडती घेतली असता त्यांच्या जवळून एक गावठी कट्टा, एक जिवंत काडतुस, मिरची पूड , कुकरी असे शस्त्र आढळून आले. चौकशीत टेमघर येथील आशापुरा ज्वेलर्स दुकानावर दरोडा टाकण्याचा त्यांचा इरादा असल्याचे समोर आले. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेने दरोड्यापूर्वीच आरोपींना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. 

          

दुसऱ्या एका घटनेत गायत्री नगर दत्त मंदिरा जवळील घरातून ८१ हजार ५६० रुपये किमतीचा चार किलो ७८ ग्रॅम गांजा आढळून आला असून याप्रकरणी आरोपी हुसेन मोहम्मद अन्सारी यास ताब्यात घेतले तर संजय नगर या भागात नशे करीता वापरण्यात येणाऱ्या १० हजार रुपये किमतीच्या गोळ्या आढळून आल्या असून या गुन्ह्यात इम्रान मोहम्मद मोअज्जम इस्लाम शेख , अराफत मोहम्मद इस्लाम शेख व मोहम्मद अक्रम मोहम्मद वहिद अन्सारी उर्फ बाबा डिंग डाँग अशा तिघांना ताब्यात घेत या तिघांनाही अटक केली असल्याची माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली.

                 

भिवंडी पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण ,सहा पोलिस आयुक्त प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलिस निरीक्षक शीतल राऊत यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या पोलीस पथकांनी या कारवाया करीत तब्बल १२ लाख ९१ हजार ८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करीत १६ गुन्ह्यांची उकल करून एकूण नऊ गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात यश मिळविले असून अटक आरोपींच्या तपासात अजून इतर गुन्ह्यांचा उलगडा होणार असल्याची शक्यता पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली आहे. शांतीनगर पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. 

Web Title: Twelve lakh items including 13 two-wheelers including cannabis and Katta seized; Nine accused arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.