येरवड्यातील दोन खुनांच्या गुन्ह्यात तब्बल २९ आरोपींना अटक, दहा विधीसंघर्षग्रस्त बालकांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2020 10:03 PM2020-06-02T22:03:16+5:302020-06-02T22:04:27+5:30

निर्घृण खुनाच्या दोन गंभीर घटनांमुळे येरवडा परिसरात झाली होती खळबळ निर्माण

Twenty nine accused were arrested in 2 Yerwada murder case, including ten minor boys | येरवड्यातील दोन खुनांच्या गुन्ह्यात तब्बल २९ आरोपींना अटक, दहा विधीसंघर्षग्रस्त बालकांचा समावेश

येरवड्यातील दोन खुनांच्या गुन्ह्यात तब्बल २९ आरोपींना अटक, दहा विधीसंघर्षग्रस्त बालकांचा समावेश

Next
ठळक मुद्देयेरवडा पोलिसांनी गुन्ह्यातील सर्व आरोपींना केली अटक  

पुणे : येरवडा परिसरात तीन दिवसात घडलेल्या वेगवेगळ्या दोन युवकांच्या निर्घृण खून प्रकरणी येरवडा पोलिसानी तब्बल २९ आरोपींना अटक केली आहे. यामध्ये १० विधिसंघर्षग्रस्त बालकांचा समावेश आहे.निर्घृण खुनाच्या दोन गंभीर घटनांमुळे येरवडा परिसरात खळबळ निर्माण झाली होती. येरवडा पोलिसांनी गुन्ह्यातील सर्व आरोपींना शिताफीने अटक केली. 
 पंचशीलनगर येथील प्रतिक वन्नाळे या युवकाचा किरकोळ वादातून २५ मे रोजी रात्री कॉमरजोन येथील मोकळ्या मैदानात डोक्यात कुराड घालून निर्घृण खून करण्यात आला होता. याप्रकरणी बच्चू उर्फ नवीन वडावराव, आमीन शेख, राहुल भोसले, तय्यब शेख या चार आरोपींना अटक करण्यात आली. तसेच गुन्ह्यातील चार विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेऊन बाल न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील अटक आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आलेली आहे. 
 लक्ष्मीनगर येरवडा येथील पूर्व रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार नितीन कसबे हा तात्पुरता जामिनावर सुटला होता. येरवडा कारागृहातून सुटल्यानंतर अवघ्या दोन तासात त्याचा सादलबाबा चौकात तीक्ष्ण हत्याराने वार करून येरवड्यातील सराईत गुन्हेगारांच्या टोळीने खून केला होता. या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी आकाश कंचीले,आकाश सपकाळ, ओमकार सोनवणे, चेतन भालेराव, कुणाल जाधव, अभिषेक खोंड, अक्षय सोनवणे, आकाश मिरे,अर्जुन मस्के,राजवीर सावत्रा, निलेश पुंड, गणेश अडसूळ, लक्ष्मण गजरमल, रिपेन्स चिआप्पा, प्रज्वल कदम अशा पंधरा आरोपींसह सहा विधिसंघर्षग्रस्त बालकांना विरुद्ध दाखल गुन्ह्यात अटक करून कारवाई करण्यात आली. येरवड्यात सराईत गुन्हेगारांच्या टोळीयुद्धातून हे गुन्हे घडत असल्याचे यामुळे निदर्शनास आले आहे. लॉकडाऊन  काळात येरवड्याच्या कंटेनमेंट झोन मध्ये झालेल्या निर्घृण खुनांच्या गंभीर गुन्ह्यांमुळे  एकच खळबळ उडाली होती. पोलिस आयुक्तांनी या गंभीर गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ ताब्यात घेण्याचे आदेश दिले होते. 

येरवडा पोलिसांनी केलेल्या कौशल्यपूर्ण तपासात गुन्ह्यातील सर्व आरोपींना जेरबंद करण्यात यश आले. या गंभीर गुन्ह्याचा सत्तास वरिष्ठ पोलिस अधिका?्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक युनुस शेख, गुन्हे निरीक्षक अजय वाघमारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बलभीम ननावरे, उपनिरीक्षक मंगेश भांगे, पोलीस हवालदार बाळासाहेब गायकवाड,  हनुमंत जाधव, किरण खुडे, पोलीस कर्मचारी रामदास घावटे, सचिन रणदिवे, गणेश पाटोळे, विनायक साळवे, संजय सकट, राहुल परदेशी, अमजद शेख,  शरद बांगर,  दौंड, सुनील सकट, नागेश कुवर, नवनाथ मोहिते, मनोज कुदळे, सुनील सकट, शरद दौंड, नितीन बोराडे यांच्या पथकाने शिताफीने केला.

Web Title: Twenty nine accused were arrested in 2 Yerwada murder case, including ten minor boys

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.