डीआयजी मोरे प्रकरणाला वेगळं वळण; बेपत्ता मुलीसोबत सापडलेल्या मुलाविरोधात पॉक्सोचा गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 04:53 PM2020-01-15T16:53:57+5:302020-01-15T16:55:42+5:30

२० वर्षीय मुलीविरोधात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Twist in the DIG More case; Pocso case registered against boy found with missing girl | डीआयजी मोरे प्रकरणाला वेगळं वळण; बेपत्ता मुलीसोबत सापडलेल्या मुलाविरोधात पॉक्सोचा गुन्हा

डीआयजी मोरे प्रकरणाला वेगळं वळण; बेपत्ता मुलीसोबत सापडलेल्या मुलाविरोधात पॉक्सोचा गुन्हा

googlenewsNext
ठळक मुद्देहा मुलगा बेपत्ता मुलीच्या कुटुंबियांच्या गॅरेजमध्ये गेल्या चार ते पाच महिन्यांपासून काम करत होता. २० वर्षीय तरुणाला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता १५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

नवी मुंबई - निलंबित डीआयजी निशिकांत मोरे प्रकरणातील बेपत्ता मुलीसोबत सापडलेल्या २० वर्षीय मुलीविरोधात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या २० वर्षीय तरुणाला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता १५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. हा मुलगा बेपत्ता मुलीच्या कुटुंबियांच्या गॅरेजमध्ये गेल्या चार ते पाच महिन्यांपासून काम करत होता. त्यामुळे त्याची आणि मुलीची ओळख होती असल्याची माहिती परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी दिली. 

डीआयजी मोरे प्रकरण : बेपत्ता मुलगी सापडली  20 वर्षीय मुलासोबत 

या प्रकरणामुळे निशिकांत मोरे यांच्याविरोधात अपहरणाचा केलेल्या आरोपात तथ्य नसल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच या प्रकरणी मोरे यांच्याविरोधात पुरावे नसल्याचे देखील स्पष्ट केले. निलंबित डीआयजी निशिकांत मोरे यांच्यावर विनयभंगाचा आरोप केलेली अल्पवयीन बेपत्ता तरुणी अखेर काल सापडली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. देहराडूनमधून या पीडित तरुणीला पोलिसांनी मुंबईत आणलं असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. एका २० वर्षीय मुलासोबत तरुणीला मुंबईत आणल्याचं सांगण्यात आलं होतं. गेल्या अनेक दिवसांपासून पीडित अल्पवयीन मुलगी बेपत्ता होती.



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबईवरून तब्बल १७०० किमी दूर या तरुणीचा शोध लागला आहे. ६ जानेवारीला पीडित मुलगी घरातून रात्री साडे अकरा वाजता बेपत्ता झाली होती. पीडित मुलगी मुंबईस्थित लोकमान्य टिळक टर्मिनसहून उत्तरप्रदेशला गेली होती. लोकमान्य टिळक टर्मिनसवरील सीसीटीव्हीमध्ये तरुणी कैद झाली होती.तेव्हापासून पोलिसांनी या तरुणीचा शोध घेण्यास सुरुवात केली. उत्तर प्रदेशात देखील नवी मुंबई पोलिसांची दोन पथकं तरुणीचा शोध घेत होती. अखेर तरुणी पोलिसांच्या हाती लागली आहे. मात्र, तिच्यासोबत सापडलेल्या तरुणावर पॉक्सो अन्वये गुन्हा दाखल केल्याने मोरे प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. 

 

Web Title: Twist in the DIG More case; Pocso case registered against boy found with missing girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.