आठ पिस्तुल अन् पंधरा काडतुसासह दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2024 01:48 PM2024-01-17T13:48:51+5:302024-01-17T13:48:54+5:30
या पथकाने मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने सापळा रचून शस्त्रासह आलेल्या चेतन संजय माळी याला ४ पिस्तुल व ८ जिवंत काडतुसासह ताब्यात घेतले.
मुंबई: राममंदिर उद्घाटन, आगामी निवडणुकांची रणधुमाळी अशा वातावरणात मुंबईत ट्रॉम्बे पोलिसांनी विक्रीसाठी आणलेल्या आठ पिस्तुल, १५ जिवंत काडतुसांसोबत चेतन संजय माळीया मुख्य आरोपीसह सिनू नरसय्या पडीगेल यांना अटक केली आहे. ट्रॉम्बे पोलिसांना या शस्त्राबाबत गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीची शहानिशा करून पोलीस उपआयुक्त हेमराजसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक तयार करण्यात आले. या पथकाने मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने सापळा रचून शस्त्रासह आलेल्या चेतन संजय माळी याला ४ पिस्तुल व ८ जिवंत काडतुसासह ताब्यात घेतले.
पोलीस कोठडी दरम्यान तपास करून आणखी ३ पिस्तुल व ५ जिवंत काडतुसे कल्याण परिसरातून हस्तगत करण्यात आली. तसेच तो सिनु नरसय्या पडिगेला याचा सतत संपर्कात असल्याने त्याला ही अटक करण्यात आली. पोलीस कोठडी दरम्यान तपासाअंतर्गत त्याच्याकडून १ पिस्तुल व व २ जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहे. सध्या दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अटक आरोपींकडून आतापर्यंत पोलिसांना ८ पिस्तुल व १५ जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात यश आले आहे.