हत्या करून पसार झालेल्या दोन  आरोपींना अवघ्या २४ तासांत अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 07:55 AM2021-05-23T07:55:14+5:302021-05-23T07:56:02+5:30

Crime News: दोन अनोळखी जोडप्यांना बहुत रात हुई है । यहा क्यू रूके हो घर पे जाओ, असे बोलल्याचा राग आल्याने त्यांनी फिर्यादीचा मित्र सुनील सोनावणे याच्यावर चाकूहल्ला करून गंभीर जखमी केले. यात त्याचा मृत्यू झाला.

Two accused were arrested in just 24 hours | हत्या करून पसार झालेल्या दोन  आरोपींना अवघ्या २४ तासांत अटक

हत्या करून पसार झालेल्या दोन  आरोपींना अवघ्या २४ तासांत अटक

Next

ठाणे : मफतलाल कंपनीतील मोकळ्या जागेत बसलेल्या दोन जोडप्यांना दोघांनी एवढ्या रात्री इथे काय करत आहात, घरी जा, असे सांगितल्याने त्याचा राग या दोघा मुलांना आला व त्यांनी रागाच्या भरात सुनील सोनावणे यांच्यावर चाकूने हल्ला करून त्यांची हत्या केली, तर त्यांचा मित्र नरेशबाबू यालाही गंभीर जखमी करून पळ काढला होता. परंतु अवघ्या २४ तासांत या हत्येतील फरार आरोपी विक्रम पटवा (२४, रा भास्करनगर, कळवा आणि मोहम्मद उस्मान रहमान शाह (२५, रा. भास्करनगर, कळवा) या दोघांना कळवा पोलिसांनी अटक केली.

कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत २० मे रोजी रात्री ११.३० च्या सुमारास मफतलाल कंपनीच्या कम्पाऊंडमध्ये असलेल्या हनुमान मंदिराजवळील नारळाच्या झाडाजवळ मोकळ्या जागेत यातील फिर्यादी व त्याचे मित्र सुनील सोनावणे यांनी सदर ठिकाणी बसलेल्या दोन अनोळखी जोडप्यांना बहुत रात हुई है । यहा क्यू रूके हो घर पे जाओ, असे बोलल्याचा राग आल्याने त्यांनी फिर्यादीचा मित्र सुनील सोनावणे याच्यावर चाकूहल्ला करून गंभीर जखमी केले. यात त्याचा मृत्यू झाला. तर फिर्यादीसही चाकू मारून गंभीर जखमी केले. या प्रकरणात आरोपींचा शोध घेत असताना तपास पथकाला मिळालेल्या माहितीनुसार दोन महिलांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्यांनी या गुन्ह्यातील विक्रम पटवा व मोहम्मद उस्मान यांची नावे सांगितले. परंतु त्यांची माहिती अपूर्ण असल्याने त्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. 

Web Title: Two accused were arrested in just 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.