हत्या करुन पसार झालेल्या दोघा आरोपींना अवघ्या 24 तासात अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 05:13 PM2021-05-22T17:13:10+5:302021-05-22T17:13:40+5:30
Murder Case : अवघ्या २४ तासात या हत्येतील फरार आरोपींचा कळवा पोलीसांनी शोध घेऊन त्यांना अटक केली आहे.
ठाणे : मफतललाल कंपनीतील मोकळ्या जागेत बसलेल्या दोन जोडप्याना दोघांनी एवढय़ा रात्री इथे काय करीत आहात, घरी जा असे सांगितल्याने त्याचा राग या दोघा मुलांना त्यांनी रागाच्या भरात सुनिल सोनावणो यांच्यावर चाकूने हल्ला करुन त्यांची हत्या केली. तर त्यांच्या मित्रलाही गंभीर जखमी करुन पळ काढला होता. परंतु अवघ्या २४ तासात या हत्येतील फरार आरोपींचा कळवा पोलीसांनी शोध घेऊन त्यांना अटक केली आहे.
या प्रकरणी विक्रम पटवा (२४) रा. भास्करनगर कळवा आणि मोहम्मद उस्मान अतिउल्ला रहमान शहा (२५) रा. भास्कर नगर कळवा यांना मोठय़ा शितीफीने अवघ्या २४ तासात अटक केली आहे. कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत २० मे रोजी रात्री ११.३० च्या सुमारास मफतलाल कंपनीचे कंपाऊडमध्ये असलेल्या हनुमान मंदीराजवळ, नारळाच्या झाडाजवळ मोकळ्या जागेत यातील फिर्यादी व त्याचे मित्र सुनिल सोनावणो रा. मफतलाल झोपडपटटी कळवा पूर्व यांनी सदर ठिकाणी बसलेल्या अनोळखी २ जोडप्यांना फिर्यादी व त्यांचा मित्न सुनिल यांनी बहुत रात हुई है । यहा क्यु रूके हो घर पे जाव असे बोलल्याचा सदर ठिकाणी बसलेल्या मुलांना राग येवुन त्यांनी फिर्यादीचा मित्र सुनील सोनावणो याच्यावर चाकुने हल्ला करुन गंभीर जखमी केले. यात त्याचा मृत्यु झाला. तर फिर्यादीसही चाकू मारून गंभीर जखमी केले. त्यानंतर या संदर्भात फिर्यादी नरेशबाबू यांनी या दोन अनोळखी इसमाविरु ध्द कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
'डॅडी'च्या बालेकिल्ल्यात दडलंय काय?; लवकरच जमीनदोस्त होणाऱ्या 'दगडी चाळी'ची जबरदस्त गोष्टhttps://t.co/aQgmiprOqU
— Lokmat (@MiLOKMAT) May 22, 2021
त्यानंतर या प्रकरणात आरोपींचा शोध घेत असताना घटनास्थळी उपस्थित असलेल्या अनोळखी महिला या भास्करनगर येथे राहण्यास असल्याबाबत बीट मार्शल ५ चे अंमलदार व तपास पथकाला माहिती मिळाल्यानुसार या महिलांचा शोध घेऊन फातिमा नासीर खान व शबनम नासीर खान यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्यांनी या गुन्ह्यातील विक्र म पटवा व मोहम्मद उस्मान यांची नावे सांगितले. परंतु त्यांची माहिती अपूर्ण असल्याने त्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. त्यानंतर त्यांच्या फेसबुक अंकाऊटवरून अधिक माहिती घेवुन त्यातील आरोपी विक्र म पटवा रा. भास्करनगर कळवा पूर्व यांची गोपनिय माहिती घेतली असता तो तुर्भे नवी मुंबई येथे कंपनीत कामास गेला असल्याबाबत माहिती मिळाल्याने तपास पथकातील अधिकारी अंमलदार त्यांनी त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्यावेळी त्याच्याकडे त्याचा साथीदार उस्मान शाह बाबत विचारपूस केली असता तो संध्याकाळी उसने पैसे मागण्याकरिता फोन करणार असून पैसे घेऊन त्याचे मूळ गाव बस्ती उत्तरप्रदेश येथे जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती त्याने दिली. त्यानुसार विक्र म पटवा यास कळवा रेल्वे स्टेशन येथे पैसे घेवून येण्यासाठी सांगितले. परंतु या ठिकाणी तो न येता त्याने दिवा रेल्वे स्टेशन येथे बोलावले. या ठिकाणी पोलिसांनी आधीच सापळा रचून ठेवला होता. त्यात तो अडकला आणि त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कळवा पोलीस करीत आहेत.