नेपाळमधून विक्रीस आणलेला अडीच काेटींचा चरस जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 05:55 AM2021-03-10T05:55:37+5:302021-03-10T05:55:57+5:30
पश्चिम द्रुतगती महामार्गावर सोमवारी एक जण ड्रग्ज तस्करीसाठी येणार असल्याची माहिती मिळताच एएनसीच्या कांदिवली युनिटचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तेथून अन्सारीला ताब्यात घेतले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नेपाळमधून मुंबईत विक्रीसाठी आणलेला सुमारे अडीच काेटी रुपयांचा १४ किलो चरस अमली पदार्थ विरोधी पथकाच्या कांदिवली युनिटने जप्त केला. याप्रकरणी परबेज महामजान अन्सारी (२३) याला अटक केली. तो नेपाळी गँगचा साथीदार आहे.
पश्चिम द्रुतगती महामार्गावर सोमवारी एक जण ड्रग्ज तस्करीसाठी येणार असल्याची माहिती मिळताच एएनसीच्या कांदिवली युनिटचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तेथून अन्सारीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे २ कोटी ८० लाखांचा चरस सापडला. न्यायालयाने त्याला १४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
नेपाळमध्ये गँगस्टर असलेला आरोपी हा सोबत चरस हा अमली पदार्थ घेऊन बोरिवली सबर्बनमध्ये येणार असलायची माहितीवरून पथकाने संजय गांधी नेशनल पार्क येथील परिसरात सापळा सोमवारी रचला. त्यावेळी नेपाळी असलेला इसम हा संशयित पद्धतीने वावरत होता. हे पथकाच्या निदर्शनास आले. पोलिसांनी त्याला हटकले आणि त्याला जेरबंद केले आणि तपासणी केल्यानंतर त्याच्याकदे १४ किलो चरस सापडला त्याची किंमत बाजारात २ कोटी ८० लाख असलयाचे तपास अधिकारी सतीश टावरे यांनी सांगितले. पोलीस पथक या नेपाळ मधून आलेल्या तस्कराचे स्थानिक पातळीवर कुणाशी संबंध आहेत. तो चरस कुणाला विकण्यासाठी आला होता याचा तपस करीत आहेत.