अलीगढजवळ अडीच वर्षांच्या मुलीची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 04:01 AM2019-06-08T04:01:50+5:302019-06-08T04:01:57+5:30

दोघांना अटक; पाच पोलीस निलंबित

A two-and-a-half year old girl was murdered in Aligarh | अलीगढजवळ अडीच वर्षांच्या मुलीची हत्या

अलीगढजवळ अडीच वर्षांच्या मुलीची हत्या

Next

अलीगढ : अडीच वर्षांच्या मुलीचा गळा चिरून निर्घृण खून केल्यानंतर तिचा मृतदेह कपड्यात गुंडाळून कचऱ्याच्या ढिगात फेकल्याची मानवतेला काळीमा फासणारी घटना उत्तर प्रदेशात घडली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. हलगर्जीबद्दल पाच पोलीस निलंबित केले आहे.

अलीगढपासून तालानगरी पन्नास किलोमीटरवर आहे. मुलीच्या वडिलांनी गावातीलच एकास ४० हजार रुपये उसने दिले होते. शिल्लक ५ हजार रुपये परत मागितल्याने ग्रामस्थ संतापला. त्याने वाईट परिणाम होतील,अशी धमकी दिली. साथीदाराच्या मदतीने मुलीचा खून केला. जाहीद असे त्याचे नाव असून असलम हा त्याचा साथीदार त्याचा शेजारी आहे. दोघांना अटक करण्यात आली आहे.

अलीगढचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक अशोक कुलहारी यांनी मुलीच्या खून प्रकरणी हलगर्जीपणा केल्याबद्दल टप्पल पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक, ३ फौजदारांसह एका शिपायास निलंबित केले आहे. खुनाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे. ३ आठवड्यांमध्ये अहवाल सादर केला जाईल. ३० मे रोजी मुलगी बेपत्ता झाली. २ जून रोजी तिचा मृतदेह विछिन्न अवस्थेत घरापासून १०० मीटर अंतरावर आढळला. 


तिच्या वडिलांनी पहिल्याच दिवशी आपल्याच गल्लीतील जाहिद याने खून केला असावा, असा संशय व्यक्त केला होता. पोलिसांनी ४ जून रोजी खुनाचा उलगडा करुन दोघांवर कारवाई केली. त्यांनी गुन्हा कबूल केला आहे.
बलात्कार नाही
पोलिसांनी सांगितले की, मुलीवर बलात्कार झाल्याचा संशय व्यक्त झाला होता, मात्र शवविच्छेदन अहवालातून तसे स्पष्ट होत नाही.
देशभर संतापाची लाट
या घटनेमुळे देशभर संतापाची लाट उसळली आहे. कॉँग्रेस नेत्या प्रियंका गांधी, बॉलीवूडमधील कलाकार, क्रिकेटर वीरेंद्र सहवाग आदींनी टष्ट्वीट केले आहे. आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. मुलीच्या आईने खुन्यांना फाशी देण्याची मागणी केली.

Web Title: A two-and-a-half year old girl was murdered in Aligarh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.