‘महात्मा गांधी पथक्रांती योजने’अंतर्गत बनावट कागदपत्रांच्या आधारेघरे देणारी दुकली जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2019 11:52 PM2019-01-02T23:52:45+5:302019-01-02T23:54:22+5:30

वाडीबंदर येथील एसव्हीपी व जेएमआर मार्गावरील फुटपाथवर राहणाऱ्या मात्र रस्ता रुंदीकरणात घर गेलेल्या नागरिकांसाठी माहुल रोडवरील आरएनए पार्पमध्ये पालिकेच्या माध्यमातून ‘महात्मा गांधी पथक्रांती योजने’अंतर्गत म्हाडा, एमएमआरडी या प्राधिकरणांनी राहण्याची व्यवस्था केली आहे.

two are arrested who were converted an ineligible hut in eligible in the SRA, | ‘महात्मा गांधी पथक्रांती योजने’अंतर्गत बनावट कागदपत्रांच्या आधारेघरे देणारी दुकली जेरबंद

‘महात्मा गांधी पथक्रांती योजने’अंतर्गत बनावट कागदपत्रांच्या आधारेघरे देणारी दुकली जेरबंद

Next

रस्ता रुंदीकरणातील बाधितांसाठी म्हणजेच प्रकल्पग्रस्तांसाठी चेंबूरच्या माहुल रोडवर पालिकेने इतर प्राधिकरणामार्फत बांधलेली घरे  बनावट कागदपत्रांच्या आधारे कोणालाही मिळवून देणाऱ्या टोळीतील दोघे जण गुन्हे शाखा कक्ष - 6 च्या जाळ्यात अडकले आहेत. बनावट कागदपत्र्यांच्या साहाय्याने घरे मिळवून दिल्याचे समजते. 

वाडीबंदर येथील एसव्हीपी व जेएमआर मार्गावरील फुटपाथवर राहणाऱ्या मात्र रस्ता रुंदीकरणात घर गेलेल्या नागरिकांसाठी माहुल रोडवरील आरएनए पार्पमध्ये पालिकेच्या माध्यमातून ‘महात्मा गांधी पथक्रांती योजने’अंतर्गत म्हाडा, एमएमआरडी या प्राधिकरणांनी राहण्याची व्यवस्था केली आहे. मात्र. काही भामट्यांनी बनावट कागदपत्रे बनवून त्याआधारे कोणालाही पालिकेची ती घरं मिळवून देत असल्याची माहिती कक्ष - 6 चे पोलीस निरीक्षक चंद्रकांत दळवी यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने अल अमीन मोहम्मद सलीम खान (36) आणि हिलाल अब्दुल रफिक शेख (48) या दोघांना जेरबंद केले. त्यांच्याकडे तीन शिधावाटप पत्रिका, 11 सर्व्हे पावत्या, दोन उमेदवारी कार्ड, खरेदी खत, ऍफेडेव्हिट, पॉवर ऑफ ऍटर्नी आदी बोगस कागदपत्रे पोलिसांना सापडली आहेत. 

Web Title: two are arrested who were converted an ineligible hut in eligible in the SRA,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.