एक लाखाची लाच घेताना नाशिकमध्ये ‘कॅट्स’चे दोन लष्करी अधिकारी जाळ्यात

By अझहर शेख | Published: October 13, 2022 10:45 PM2022-10-13T22:45:21+5:302022-10-13T22:46:03+5:30

लष्करी अस्थापनामध्ये 'सीबीआय'चा सापळा

Two army officers of 'CATS' caught in Nashik while accepting bribe of Rs | एक लाखाची लाच घेताना नाशिकमध्ये ‘कॅट्स’चे दोन लष्करी अधिकारी जाळ्यात

एक लाखाची लाच घेताना नाशिकमध्ये ‘कॅट्स’चे दोन लष्करी अधिकारी जाळ्यात

googlenewsNext

नाशिक : येथील गांधीनगरमधील कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या (कॅट्स) आवारात एका दोन लष्करी अधिकारी लाचेली रक्कम मागताना व स्वीकारताना सापळ्यात अडकल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि.१३) घडली. केंद्रीय गुन्हे अन्वेषण नाशिक विभागाच्या पथकाने सापळा रचून त्या संशयित लष्करी अधिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे, अशी माहिती सीबीआय च्या नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक रणजित पांडे यांनी सांगितले

नाशिक शहरातील कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या आवारात एका ठेकेदाराकून एक लाख २० हजार रुपयांची लाचेची मागणी संशयित मेजर हिमांशु मिश्रा, कनिष्ठ अभियंता मिलिंद वाडीले यांनी केली. तसेच लाचेची रक्कम गुरुवारी संध्याकाळी पाच वाजता कॅट्सच्या आवारात स्वीकारली असता पथकाने त्यांना रंगेहात ताब्यात घेतले. हे दोन्हीही लष्करी अधिकारी येथील इंजिनिअरिंग सर्व्हीस विभागाक कार्यरत आहेत. मिश्रा हे सहायक गॅरिसन इंजिनिअर तर वाडिले हे कनिष्ठ इंजिनिअर पदावर असल्याचे सीबीआयच्य सुत्रांनी सांगितले.

या दोघांनी एका ठेकेदाराकडून काही तरी कामाच्या मोबदल्यात एक लाख वीस हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. तसेच लाचेची ही रक्कम गुरुवारी दोघांनी स्वीकारली असता केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने त्यांना ताब्यात घेतले. नाशिकमध्ये सैनिकी अस्थापनामध्ये अशाप्रकारचा भ्रष्टाचार पहिल्यांदाच उघडकीस आला आहे. यामुळे अस्थापनांच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या दोघा लष्करी अभियंत्यांनी एका ठेकेदाराकडे लाचेची रक्कम मागितली. कंत्राटदाराने याबाबत सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाकडे तक्रार केली. पथकाने तक्रारीची दखल घेत त्याबाबत शहनिशा करून खात्री पटविली. त्यानंतर गुरुवारी तक्रारदाराकडून दोघा संशयितांनी लाचेची रक्कम स्वीकारली असता सीबीआयच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे रात्री उशीरापर्यंत चौकशी केली जात होती. शहरातील लष्करी अस्थापनांमध्ये लाचखोरीविरोधात झालेली ही पहिलीच कारवाई आहे. या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे.

Web Title: Two army officers of 'CATS' caught in Nashik while accepting bribe of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.