रेल्वेत नोकरीला लावण्याचे प्रलोभन दाखवणारे अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2019 02:21 AM2019-10-04T02:21:50+5:302019-10-04T02:21:57+5:30

रेल्वेत नोकरी लावून देण्याचे प्रलोभन दाखवत बनावट नियुक्तीपत्र, ओळखपत्र पाठवून एका विद्यार्थ्याची फसवणूक करणाऱ्या आशीष सक्सेना (२६) आणि राज द्विवेदी (२४, दोघे रा. कल्याण) या दुकलीला पोलिसांनी अटक केली.

two arrest in Kalyan | रेल्वेत नोकरीला लावण्याचे प्रलोभन दाखवणारे अटकेत

रेल्वेत नोकरीला लावण्याचे प्रलोभन दाखवणारे अटकेत

Next

कल्याण : रेल्वेत नोकरी लावून देण्याचे प्रलोभन दाखवत बनावट नियुक्तीपत्र, ओळखपत्र पाठवून एका विद्यार्थ्याची फसवणूक करणाऱ्या आशीष सक्सेना (२६) आणि राज द्विवेदी (२४, दोघे रा. कल्याण) या दुकलीला पोलिसांनी अटक केली.
नाशिक येथे राहणाºया २४ वर्षांच्या विद्यार्थ्याला सक्सेना याने रेल्वेत नोकरी लावून देण्याचे प्रलोभन दाखवले. याचदरम्यान विद्यार्थ्याच्या मोबाइलवर नियुक्तीपत्र पाठवून त्याचा विश्वास संपादन केला. त्यानंतर, सक्सेना याने त्याच्या आणि मित्र द्विवेदी याच्या खात्यांवर विद्यार्थ्याकडून १८ लाख रुपये घेतले. मात्र फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर विद्यार्थ्याने महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी सक्सेना आणि द्विवेदी या दोघांना अटक केली. या दोघांकडून नऊ लाखांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे.

Web Title: two arrest in Kalyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.