प्रायव्हेट पार्टमध्ये लपवून सोन्याची तस्करी, आसाममध्ये दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2022 08:53 PM2022-01-07T20:53:38+5:302022-01-07T20:54:47+5:30

Gold Smuggling Case : याठिकाणी सोन्याची तस्करी होण्याची शक्यता असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यांकडून मिळाली होती.

Two arrested in Assam for smuggling gold hidden in private parts | प्रायव्हेट पार्टमध्ये लपवून सोन्याची तस्करी, आसाममध्ये दोघांना अटक

प्रायव्हेट पार्टमध्ये लपवून सोन्याची तस्करी, आसाममध्ये दोघांना अटक

Next

आसाममधील बोकाजानमध्ये पोलिसांनी एका महिलेला आणि तिच्या साथीदाराला सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी अटक केली आहे. महिलेने अर्धा किलो सोने तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये लपवून ठेवल्याचे सांगण्यात येत आहे.

याठिकाणी सोन्याची तस्करी होण्याची शक्यता असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यांकडून मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी शोधमोहीम राबवत दोन तस्करांना जेरबंद करण्यात मोठे यश मिळवले. कोहिमाहून गुवाहाटीला जाणाऱ्या बसमध्ये चढलेल्या दोघांनाही अटक केली.

पोलिसांनी सांगितले की, महिलेने हे सोने तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये लपवले होते. जेणेकरून कुणालाही संशय येऊ नये आणि सोन्याची तस्करी सहज करता येईल. हे तस्कर सोनं विकण्यासाठी मणिपूरमधील इंफाळ येथून गुवाहाटी येथे सोने आणत होते. हे सोने जप्त करून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

दोन्ही आरोपींना अटक करून कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. अशा घटनांना आळा बसण्यासाठी पोलीस विशेष रणनीती आखत आहेत. आगामी काळात पोलिसांबाबत अधिकाधिक कडक कारवाई करण्यात येणार असून शोधमोहीम वाढवण्यात येणार आहे. जेणेकरून गुन्हेगार पळून जाऊ शकत नाही.

पतीसोबत भांडण झाल्यानंतर पत्नीने घेतला गळफास लावून; त्यावेळी पोलीस पोहोचले अन्...

महिलेने तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये तीन सोन्याची बिस्किटे लपवली होती.

याप्रकरणी एपीएस जॉन दास सांगतात की, गुप्त माहितीच्या आधारे गुरुवारी मणिपूरहून गुवाहाटीकडे जाणाऱ्या बसमध्ये दोन तस्कर असल्याची बातमी आली, त्याअंतर्गत आम्ही बस थांबवली. एक महिला आणि एका तरुणाला ताब्यात घेतले. यानंतर दोघांची वेगवेगळी झडती घेतली असता अर्धा किलो सोने जप्त करण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, महिलेने गुप्तांगात अर्धा किलो वजनाची तीन बिस्किटे लपवली होती. इंदू ग्वाला पोंगरा आणि उगेश पोंगरा अशी आरोपींची नावे आहेत.

 

Web Title: Two arrested in Assam for smuggling gold hidden in private parts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.