घरफोडी करणाऱ्या सराईत दुकलीला अटक, सुरक्षारक्षक नसलेल्या इमारतींमध्ये चोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2020 02:41 AM2020-12-08T02:41:03+5:302020-12-08T02:41:24+5:30

Crime News : घरफोडीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून कसून प्रयत्न सुरू आहेत. त्याकरिता गुन्हे घडणाऱ्या परिसरातले सीसीटीव्ही तपासले जात आहेत.

two arrested for burglary, burglary in buildings without security guards | घरफोडी करणाऱ्या सराईत दुकलीला अटक, सुरक्षारक्षक नसलेल्या इमारतींमध्ये चोरी

घरफोडी करणाऱ्या सराईत दुकलीला अटक, सुरक्षारक्षक नसलेल्या इमारतींमध्ये चोरी

googlenewsNext

 नवी मुंबई : घरफोडी प्रकरणी वाशी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ते सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर मुंबई व परिसरात ४०हून अधिक गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून चार गुन्ह्यांची उकल झाली असून त्यामधील ३ लाख ७७ हजार रुपये किमतीचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.

घरफोडीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून कसून प्रयत्न सुरू आहेत. त्याकरिता गुन्हे घडणाऱ्या परिसरातले सीसीटीव्ही तपासले जात आहेत. यादरम्यान १००हून अधिक ठिकाणच्या सीसीटीव्हीच्या तपासणीत वाशी पोलिसांच्या हाती माहिती लागली होती. दोन व्यक्ती कारमधून परिसरात रेकी करून रात्रीच्या वेळी घरफोडी करत असल्याचे समोर आले होते. त्यानुसार पोलिसांनी रात्रीच्या वेळी सापळा रचला होता. त्याकरिता वरिष्ठ निरीक्षक संजीव धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद तोरडमल, सहायक निरीक्षक सचिन ढगे, उपनिरीक्षक शशिकांत लोंढे, हवालदार शैलेंद्र कदम, संजय भाले, श्रीकांत सावंत आदींचे पथक तयार करण्यात आले होते. यावेळी शुक्रवारी रात्री दोघे जण संशयास्पद वावरताना आढळून आले. अधिक चौकशीत ते चोर असल्याचे समोर येताच त्यांना अटक करण्यात आली आहे. 

संजय कांबळे (४२) व सद्दाम खान (३८) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून वाशी पोलीस ठाणे हद्दीतले तीन व दादरचा एक गुन्हा उघड झाल्याचे पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी सांगितले. त्यामधील ३ लाख ७७ हजार रुपये किमतीचा चोरीचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे. 

Web Title: two arrested for burglary, burglary in buildings without security guards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.