सुशांतसिंह ड्रग्जप्रकरणी दोन तस्करांना अटक, पाच किलो चरससह लाखोंची रोकड जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2020 06:44 AM2020-12-10T06:44:18+5:302020-12-10T06:44:41+5:30

Drug case : जीत हा गेल्या तीन महिन्यांपासून एनसीबीच्या रडारवर होता. तस्कर अनुज केशवानीने त्याच्याकडून ड्रग्ज घेत असल्याची कबुली दिली आहे.

Two arrested in drug case | सुशांतसिंह ड्रग्जप्रकरणी दोन तस्करांना अटक, पाच किलो चरससह लाखोंची रोकड जप्त

सुशांतसिंह ड्रग्जप्रकरणी दोन तस्करांना अटक, पाच किलो चरससह लाखोंची रोकड जप्त

Next

मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या ड्रग्जकनेक्शनशी संबंधित दोघा तस्करांना अमली पदार्थ नियंत्रण कक्ष (एनसीबी) अटक केली. जितेंद्र जैन उर्फ रंगेल महाकाल उर्फ जीत व मोहम्मद आझम जुम्मान शेख अशी त्यांची नावे आहेत.

जीत हा गेल्या तीन महिन्यांपासून एनसीबीच्या रडारवर होता. तस्कर अनुज केशवानीने त्याच्याकडून ड्रग्ज घेत असल्याची कबुली दिली आहे. तर शेखकडून १३ लाखांच्या रोकडसह ५ किलो चरस व मलामा क्रीम जप्त केले. तो अभिनेत्री रिया चक्रवर्ती व तिचा भाऊ शोविक यांना सुशांतसाठी चरस व गांजा पुरवित होता, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दोघांकडून बॉलीवूडमधील अन्य काही नावे पुढे येण्याची शक्यताही आधिकाऱ्यांनी वर्तविली.

सुशांतच्या मृत्यू प्रकरणात ड्रग्ज कनेक्शन आल्यानंतर एनसीबीने रिया, तिचा भाऊ शोविक आणि तस्कर केशवानीला अटक केली हाेती. त्यांच्या चौकशीतून महाकालचे नाव पुढे आले. सुशांतला लागणारे ड्रग्ज तो केशवानीला पुरवित होता, त्यानंतर त्याच्यामार्फत ते त्याला मिळत असल्याचे तपासातून समोर आले होते. तेव्हापासून महाकाल एनसीबीच्या रडारवर होता. त्याला मंगळवारी रात्री अटक करण्यात आली असून, न्यायालयाने दोन दिवसांची कोठडी सुनावली आहे.

तर शेखला बुधवारी ओशिवरा येथील मिल्लत नगरमधील घरातून अटक केली. त्याच्याकडून ५ किलो चरस व मलामा क्रीम जप्त करण्यात आली. एक किलो क्रीमची किंमत सरासरी ४०-५० लाख असल्याचे आधिकाऱ्यांनी सांगितले.

आराेप लावले फेटाळून
एनसीबीचे मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई केली. महाकालने मात्र आपल्यावरील आरोप फेटाळून लावले. या प्रकरणात आपल्याला गुंतविण्यात आल्याचा आरोप त्याने केला.

Web Title: Two arrested in drug case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.