मस्जिदीवर भगवा झेंडा फडकवण्याच्या आरोपाखाली दोघांना अटक; मेरठमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2020 08:06 PM2020-08-08T20:06:11+5:302020-08-08T20:12:11+5:30

पोलिसांनी सांगितले की, हा फोटो व्हायरल झाल्यानंतर कोणताही हिंसाचार झाला नाही, फोटो व्हायरल कसे झाले याचा पोलिसही तपास करत आहेत.

Two arrested for flying saffron flag at mosque; Incident in Meerut | मस्जिदीवर भगवा झेंडा फडकवण्याच्या आरोपाखाली दोघांना अटक; मेरठमधील घटना

मस्जिदीवर भगवा झेंडा फडकवण्याच्या आरोपाखाली दोघांना अटक; मेरठमधील घटना

googlenewsNext
ठळक मुद्देदोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाली. मेरठच्या कोतवाली मशिदीवर भगवा ध्वज फडकावल्याचा आरोप दोघांवर आहे.व्हायरल फोटो  2019 मध्ये काढण्यात आले होते. एसपी पुढे म्हणाले, "व्हिडिओमध्ये दिसणार्‍या दोघांना अटक केली गेली आहे.

मेरठमधील पोलिसांनीमशिदीवर भगवा ध्वज फडकवल्याप्रकरणी दोन जणांना अटक केली आहे. दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाली. मेरठच्या कोतवाली मशिदीवर भगवा ध्वज फडकावल्याचा आरोप दोघांवर आहे.

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या माहितीनुसार, एसपी (मेरठ सिटी) अखिलेश एन सिंह यांचे म्हणणे आहे की, व्हायरल फोटो  2019 मध्ये काढण्यात आले होते. एसपी पुढे म्हणाले, "व्हिडिओमध्ये दिसणार्‍या दोघांना अटक केली गेली आहे. असे दिसते की मुख्यत: हा व्हिडिओ मागील वर्षी बनविला गेला होता. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे."


अंकित त्रिपाठी आणि अरुण अशी दोन्ही आरोपींची नावे आहेत. एक्स्प्रेसच्या बातमीत स्थानिक भाजप नेते गोपाल शर्मा यांच्या हवाल्यानुसार असे म्हटले आहे की, अटक केलेले दोन तरुण बजरंग दलाचे आहेत. याप्रकरणी दोन्ही आरोपींविरोधात भादंवि कलम १५३ ए (दोन धर्मांमधील द्वेष भडकावणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, हा फोटो व्हायरल झाल्यानंतर कोणताही हिंसाचार झाला नाही, फोटो व्हायरल कसे झाले याचा पोलिसही तपास करत आहेत.

 

मेरठच्या गुन्हे शाखेच्या सोशल मीडिया सेलला दोघांचा व्हिडीओ मिळाला होता. अल्पसंख्याक समुदायाच्या प्रार्थना स्थळी दोघे ध्वज ध्वज लावत असल्याचे दिसून येत आहे. - अखिलेश एन सिंग, एसपी (मेरठ सिटी)

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

...चांगला मेसेज गेला नाही; बिहार पोलीस अधिकाऱ्याला क्वारंटाईन केल्याबद्दल SC ने कान खेचले!

 

Disha Salian Case: नारायण राणेंच्या गंभीर आरोपानंतर पोलिसांचं पुराव्यांसाठी आवाहन

 

खळबळजनक! कारागृहात कैद्याने गळफास लावून केली आत्महत्या 

 

सुशांत राजपूत प्रकरणाच्या तपासासाठी मुंबईत आलेले बिहारचे पोलीस परतले; १२ जणांची केली चौकशी

 

सुशांतच्या डायरीची शेवटची पाने महत्वाची, सुगावा लागू शकतो मारेकऱ्याचा

 

Breaking : वलसाडमधील बायोकेमिकल कंपनीला भीषण आग

 

भीषण! उल्हासनगरात नाश्त्याच्या हॉटेलमध्ये सिलेंडरचा स्फोट, एकाचा मृत्यू तर ११ जण जखमी

 

Disha Salian Case : नवं वळण; आत्महत्येच्या १ तासपूर्वीचा व्हिडीओ झाला उघड

 

Air India Plane Crash : विमान दुर्घटनेत मृत पावलेल्या मुख्य वैमानिक दीपक साठे यांच्या कुटुंबीयांची गृहमंत्र्यांनी घेतली भेट 

Web Title: Two arrested for flying saffron flag at mosque; Incident in Meerut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.