एटीएम कार्डची अदला बदल करत फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक
By रूपेश हेळवे | Published: January 13, 2023 03:27 PM2023-01-13T15:27:44+5:302023-01-13T15:27:57+5:30
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून त्यांनी आरोपी सागर जाधव व पृथ्वीराज अडसुळे यांना ताब्यात घेऊन संशयित इसमांची चौकशी केली.
सोलापूर : एटीएम केंद्रात वयस्करांना व ज्यांना एटीएम मशीनचा वापर न करता येणार्यांना हेरून त्यांचे एटीएम कार्डची अदलाबदल करत फसवणूक करणार्या दोघा तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. सागर शामकुमार जाधव ( वय ३१, रा. आकाश नगर), पृथ्वीराज मोहन अडसुळे ( वय २४, रा. काका नगर, सांजा रोड, उस्मानाबाद ) असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
त्यांच्याकडून चोरीच्या तीन दुचाकीही पोलिसांनी जप्त केले आहे.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून त्यांनी आरोपी सागर जाधव व पृथ्वीराज अडसुळे यांना ताब्यात घेऊन संशयित इसमांची चौकशी केली. त्यांनी तीन दुचाकी चोरल्याचे कबूल केले. या शिवाय एटीएम केंद्रावर आलेल्या वृद्धांना व मशीनची माहिती नसणार्यांना मदत करण्याचे अश्वासन देत, हातचलाखी करत एटीएम कार्डची अदलाबदली करत पैसे काढून घेत फसवणूक केल्याची कबुली दिली, अशी माहिती पोलिसांनी दिली.