हॉटेल मालकावर चाकू हल्ला करणाऱ्या दोघांना अटक, चॉपर गँगची दहशत

By अजित मांडके | Published: December 16, 2023 05:49 PM2023-12-16T17:49:57+5:302023-12-16T17:50:28+5:30

दोघांनाही २० डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. 

Two arrested for knife attack on hotel owner, terror of chopper gang | हॉटेल मालकावर चाकू हल्ला करणाऱ्या दोघांना अटक, चॉपर गँगची दहशत

हॉटेल मालकावर चाकू हल्ला करणाऱ्या दोघांना अटक, चॉपर गँगची दहशत

ठाणे : जेवणाची ऑर्डर देण्यासाठी उशीर झाल्याच्या रागातून हॉटेल मालक निलेश शेट्टी (४५) यांच्यावर चाकू हल्ला करणाऱ्या ओंकार भोसले (२७) आणि अभि पाटील (२५) या दोघांना अटक केल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी शनिवारी दिली. दोघांनाही २० डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. 

आझाद नगर, ब्रम्हांड परिसरातील सागर गोल्डन हील टॉप या हॉटेलमध्ये २२ नोव्हेंबर २०२३ रोजी  रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास आझादनगर परिसरातील रेकॉर्डवरील गुन्हेगारील गुंड ओंकार याच्यासह अभि पाटील तसेच  त्यांचा अन्य एक साथीदार राजू शर्मा (२६) असे तिघेजण दारू पिण्यास आणि जेवण करण्यासाठी गेले होते. हॉटेलच्या टेरेसवरील टेबलवर बसल्यानंतर त्यांनी दारूसह जेवणाची आॅर्डर  दिली. आॅर्डर दिल्यानंतरही ती मिळण्यास बराच वेळ लागल्याने त्यांनी जोरजोरात टेबल वाजवायला सुरुवात केली. अभि यानेच टेबल उलटा करीत मोठया प्रमाणात नुकसानही केले. वेटरलाही  शिवीगाळ केली.  हॉटेल चालक संतोष शेट्टी (४२, रा. घोडबंदर रोड, ठाणे) यांनी तिघांनाही हॉटेलच्या बाहेर जाण्यास सांगितले. 

बाहेर गेल्यानंतर काही वेळातच ओंकारने चाकूसह  हॉटेलमध्ये शिरकाव केला. हॉटेलचे दुसरे भागीदार निलेश अण्णा यांनीही त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. तेंव्हा ओंकारने त्यांच्या डाव्या हातावर चाकूने वार करून त्यांना जखमी केले. तर त्याच्या दोघा साथीदारांनी हॉटेलमध्ये तोडफोड करून नुकसान केले. या घटनेनंतर हल्लेखोर मोटार सायकलने तिथून पसार झाले. या प्रकरणी कासारवडवली पोलिसांनी ओंकारसह अभि आणि राजू या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. यातील ओंकार आणि अभि यांना वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल पाटील आणि सहायक पोलिस निरीक्षक सुहास हट्टेकर यांच्या पथकाने १६ डिसेंबर रोजी अटक केली. 

ओंकारविरुद्ध हाणामारीचे २४ गुन्हे 
ओंकार याच्याविरुद्ध हाणामारीसह गंभीर स्वरुपाचे २४ गुन्हे दाखल आहेत. चाकूने हल्ला केल्याचा हा संपूर्ण थरार हॉटेलच्या सीसीटीव्हीमध्येही कैद झाला होता. सोशल मिडीयावरही हे  हे थरारनाट्य  व्हायरल झाले होते. दारू पिण्यासाठी ते कासारवडवली भागात एका ठिकाणी आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली.

Web Title: Two arrested for knife attack on hotel owner, terror of chopper gang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.