काशीमिरा गुन्हे शाखेकडून एमडी ड्रग्स बाळगणाऱ्या दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2020 08:23 PM2020-09-19T20:23:47+5:302020-09-19T20:24:28+5:30
ठाणे ग्रामीण पोलीस स्थानिक गुन्हे शाखेच्या काशीमिरा युनिटने एमडी या अमली पदार्थांसह दोघांना मीरारोडच्या नया नगर भागातून अटक केली आहे.
मीरारोड - मुंबई पोलिसांनी भाईंदरमध्ये येऊन दोन किलो चरस व दोघांना पकडल्यापासून स्थानिक पोलीस सक्रिय झाले आहेत. ठाणे ग्रामीण पोलीस स्थानिक गुन्हे शाखेच्या काशीमिरा युनिटने एमडी या अमली पदार्थांसह दोघांना मीरारोडच्या नया नगर भागातून अटक केली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नयानगर परिसरात गस्त घालत असताना संशया वरून त्यांनी दोघं तरुणांना ताब्यात घेतले. त्यांची तपासणी केली असता त्यांच्या कडे एमडी हे अमली पदार्थ आढळले. पोलिसांनी आसिफ अली अफजर शेख (२४) व तारीक सिद्दीकी (२२) या दोघांना अटक केली असून आहे. आसिफकडे २५ ग्रॅम तर तारिककडे २० ग्रॅम एमडी ड्रग्स सापडले. अटक आरोपीना ठाणे न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंके तपास करत आहेत.
अन्य महत्वाच्या बातम्या...
महिलेचे अश्लील फोटो व्हायरल करणारा निघाला तिचाच पती
नात्याला काळीमा! पतीने पकडून ठेवले अन् मित्र करीत राहिला पत्नीवर अत्याचार
चीनसाठी हेरगिरी करणाऱ्या पत्रकारासह महिला आणि पुरुषास अटक
बलात्कारास विरोध केल्याने काकाने चिमुकलीचे केली हत्या, कुजलेल्या मृतदेहावर आढळल्या कुत्र्याने चावा घेतलेल्या खुणा
युपी पोलिसांचा आणखी एक कारनामा, जेलमध्ये पाटवण्याची धमकी देऊन घेतली ऑनलाईन लाच
Disha Salian Death Case : मृत्यूपूर्वी दिशा सालियननं १०० नंबरवर कॉल केला होता का? मुंबई पोलिसांनी केला खुलासा
करोडो रुपयांच्या ड्रग्जसह सापडला पेडलर, बॉलिवूड कनेक्शनबाबत भांडाफोड होणार