लॉकडाऊनमध्ये गांजाची विक्री करणाऱ्या दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2020 02:12 AM2020-07-05T02:12:33+5:302020-07-05T02:12:53+5:30
गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कक्ष १०ने ही कारवाई करून त्यांच्याकडून ३ लाखांचे अंमली पदार्थ हस्तगत केले आहेत.
मुंबई : लॉकडाऊनमध्ये अंमली पदार्थ विक्री करणाºया दोघांच्या मुसक्या आवळण्यात शनिवारी पोलिसांना यश आले. गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कक्ष १०ने ही कारवाई करून त्यांच्याकडून ३ लाखांचे अंमली पदार्थ हस्तगत केले आहेत.
मोहम्मद फय्याज खान (२९) आणि अमित मिश्रा (२९) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. शुक्रवारी दिंडोशी भागात हे दोघे स्कूटरने येणार असल्याची ‘टीप’ कक्ष १०चे सहायक पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांना मिळाली.
त्यानुसार प्रभारी विनय घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पठाण यांनी सापळा रचत दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतीत २० किलो ७०० ग्रॅम गांजा त्यांना सापडला. स्कूटरच्या डिक्कीमध्ये त्यांनी तो लपवून ठेवला होता. त्यांना अटक करत न्यायालयात हजर केले असता ७ जुलै, २०२० पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.