कासवांची विक्री करणाऱ्या दोघांना अटक, पंचवटी चौकात कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2020 08:14 PM2020-07-25T20:14:00+5:302020-07-25T20:14:39+5:30
वनविभागाने त्यांची दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळविली आहे.
पोहरा बंदी (अमरावती) : अमरावती शहरातील पंचवटी चौकातून शनिवारी पहाटे चारच्या सुमारास दोघांकडून विक्रीसाठी आणलेले १३ कासव जप्त करण्यात आले. वनविभागाने त्यांची दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळविली आहे.
भोपाळहून विक्रीसाठी कासव आणले जात असल्याची माहिती भरारी पथकाचे आरएफओ महेश धंदर, शिकारी प्रतिबंधक आरएफओ शेख सलीम यांना मिळाली होती. त्यारीन पंचवटी चौकात धाड घातली. या धाडीत दोन आरोपींकडून १३ कासव, एक दुचाकी हस्तगत करण्यात आली. निशांत भरतलाल जरवाल (३०) व सार्थक लक्ष्मण भांडे (१८, दोघेही रा. अमरावती) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध वनगुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्यात वापरण्यात आलेली एम.एच. २७ सी.एन. ३१७४ क्रमांकाची दुचाकी ताब्यात घेण्यात आली. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. उपवनसंरक्षक गजेंद्र नरवणे, विभागीय वनअधिकारी हरिचंद्र वाघमोडे यांच्या नेतृत्वात वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास भुंबर, वडाळी वर्तुळ अधिकारी राजेश घागरे हे तपास करीत आहेत.
अन्य महत्वाच्या बातम्या...
खळबळजनक! ८ वर्षाच्या मुलावर २५ वर्षाच्या नराधमाने केले लैंगिक अत्याचार
Coronavirus News : सांगलीतील इंदिरानगर येथील कंटेनमेंट झोन नागरिकांनी केला उध्वस्त
'वॉरियर' आजीबाईंची गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली भेट अन् दिली एक लाखांची मदत