बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या दोघांना ठाण्यातून अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2020 01:12 AM2020-10-28T01:12:19+5:302020-10-28T01:12:39+5:30

Thane Crime news : ठाण्यातील सिडको बस थांब्यावर दोघे जण बिबट्याच्या कातडीची विक्री करण्यासाठी येणार असल्याची टीप पोलीस हवालदार गणेश बडगुजर यांना मिळाली होती.

Two arrested for smuggling leopard skin | बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या दोघांना ठाण्यातून अटक

बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या दोघांना ठाण्यातून अटक

Next

ठाणे : बिबट्याच्या कातडीची दहा लाख ९० हजारांमध्ये तस्करी करणाऱ्या सचिन भोसले (३३) आणि शहाजी दांडे (३२) या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने नुकतीच अटक केली. त्यांच्या झडतीमध्ये बिबट्याचे कातडे हस्तगत करण्यात आले आहे.
|
ठाण्यातील सिडको बस थांब्यावर दोघे जण बिबट्याच्या कातडीची विक्री करण्यासाठी येणार असल्याची टीप पोलीस हवालदार गणेश बडगुजर यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अविराज कुऱ्हाडे, संदीप बागुल, योगेश काकड तसेच पोलीस हवालदार शिवाजी गायकवाड, संभाजी मोरे, सुनील माने, रवींद्र काटकर, बडगुजर, भगवान हिवरे आदींच्या पथकाने २३ ऑक्टोबर रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास सिडको बस थांबा येथे सापळा लावला. त्या वेळी तिथे आलेल्या सचिन आणि शहाजी या दोघांना या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतीमध्ये त्यांच्याकडून बिबट्याचे कातडे हस्तगत करण्यात आले. या कातड्याची दहा लाख ९० हजारांमध्ये विक्री करणार होते, अशी त्यांनी कबुली दिली. या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध ठाणेनगर पोलीस ठाण्यात २४ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना सुरुवातीला २६ ऑक्टोबपर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती. त्यानंतर ९ नोव्हेंबपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

Web Title: Two arrested for smuggling leopard skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.