हौेसेपोटी दुचाकी चोरणाऱ्या दोघांना पिंपरी पोलिसांनी केली अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 06:34 PM2020-06-30T18:34:24+5:302020-06-30T18:35:23+5:30

हौसेपोटी वाहने चोरल्याचे तपासात निष्पन्न

Two arrested for stealing two-wheeler | हौेसेपोटी दुचाकी चोरणाऱ्या दोघांना पिंपरी पोलिसांनी केली अटक

हौेसेपोटी दुचाकी चोरणाऱ्या दोघांना पिंपरी पोलिसांनी केली अटक

Next

पिंपरी : हौसेपोटी दुचाकी चोरणाऱ्या रेकॉर्डवरील दोन आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून एक लाख ४० हजारांच्या तीन दुचाकी जप्त केल्या. पिंपरी पोलिसांनी ही कामगिरी केली. 
किरण ऊर्फ दाद्या गौमत शिंदे (वय २३, रा. आदर्शनगर, पाचपीर चौक, काळेवाडी, मुळ रा. गांधीनगर, पिंपरी), सुनील मल्हारी तलवारे (वय ३२, रा. भारतनगर, पिंपरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षल राजन सांगुळे (वय २०, रा. मिहीर अपार्टरमेट, सुखवानी पार्क, अजमेरा, पिंपरी) यांनी दि. ०९ जून रोजी रात्री साडेआठ ते १० जून रोजी सकाळी सातच्या दरम्यान त्यांच्या घराच्या पार्किंगमध्ये त्यांची दुचाकी पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने ती दुचाकी चोरून नेली. याप्रकरणी हर्षल सांगुळे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी वाहन चोरीचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास पोलिसांकडून सुरू होता. त्यावेळी पथकातील पोलीस गस्तीवर असताना टेल्को रोड, चिंचवड येथे नवीन पुलाजवळ एका दुचाकीवरून आरोपी शिंदे व तलवारे हे दोघे भरधाव केएसबी चौकाच्या दिशेने गेले. गस्तीवरील पोलिसांनी त्यांना थांबवून ताब्यात घेतले. त्यांच्याकडील दुचाकी अजमेरा, पिंपरी येथून चोरल्याचे त्यांनी सांगितले. आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांनी हौसेपोटी वाहने चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले. तसेच पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल असलेले दोन व चिंचवड पोलीस ठाण्यात दाखल एका गुन्ह्याची उकल झाली आहे. 
पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद वाघमारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैभव सोनवणे, पोलीस कर्मचारी विवेक सपकाळे, गणेश भिसे, जावेद बागसिराज, श्रीकांत जाधव, उमेश वानखडे, रोहित पिंजरकर, शहाजी धायगुडे, सोमेश्वर महाडिक, संजय कुºहाडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Web Title: Two arrested for stealing two-wheeler

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.