44 पेट्या अवैध दारूसह दोघांना अटक, सावली पोलिसांची कारवाई
By परिमल डोहणे | Published: May 10, 2023 04:20 PM2023-05-10T16:20:00+5:302023-05-10T16:20:13+5:30
अतुल संजय सूर्यवंशी (29), आसिफ जमाल शेख (33) दोघेही रा. तुकूम चंद्रपूर असे अटकेतील आरोपीचे नाव आहे तर महेश गड्डमवार रा व्याहाड बुज हा फरार असून सावली पोलिस तपास करत आहे.
चंद्रपूर : चारचाकी वाहनातून अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांना सावली पोलिसांनी पोलिस स्टेशन समोरच नाकाबंदी करून अटक केली. मंगळवारी मध्यरात्री केलेल्या कारवाईत अवैध दारूच्या 44 पेट्यांसह तब्बल दहा लाख 14 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईने अवैध दारू विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. अतुल संजय सूर्यवंशी (29), आसिफ जमाल शेख (33) दोघेही रा. तुकूम चंद्रपूर असे अटकेतील आरोपीचे नाव आहे तर महेश गड्डमवार रा व्याहाड बुज हा फरार असून सावली पोलिस तपास करत आहे.
मंगळवारी मध्यरात्री मूल गडचिरोली मार्गावरून अवैध दारूची वाहतूक होत असल्याची माहिती सावली पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर सावली पोलिसांनी पोलिस ठाण्यासमोरच नाकाबंदी केली. दरम्यान संशयित वाहनl क्रमांक एमएच 27 एआर 9531 वाहन येताच त्याला थांबवून झडती घेतली. यावेळी वाहनात रॉकेट संत्रा देशी दारू कंपनीच्या 44 पेट्या आढळून आल्या. पोलिसांनी सर्व दारूसाठा व वाहन असा एकूण दहा लाख 14 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोघांना अटक केली तर एकजण फरार आहे.
ही कारवाई सावली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आशिष बोरकर यांच्या मार्गदर्शनात सावली पोलिसांनी केली. ही कारवाई पोलिस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी, अप्पर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू, उपविभागीय पोलिस अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे यांचे मार्गद्शनाखाली व ठाणेदार आशिष बोरकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिस उपनिरीक्षक मडावी, स. फौ. खरकाते, पो का. धीरज, निलेश, महिला अंमलदार विशाखा यांच्यासह सावली पोलिसांच्या पथकानी केली.